ठाणे: ठाण्यातील तीन पेट्रोल पंप या जुन्या आणि उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये ‘फॅमेली सलोन आणि स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात नौपाडा पोलिसांनी दोन तरूणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. तर एका दलाल महिलेला अटक केली आहे.

तीन पेट्रोल पंप येथे शमा फॅमेली अँड ब्युटी सलोन आहे. या सलोनमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने एक बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून सलोनमधील महिला दलालाशी संपर्क साधला. साडेतीन हजार रुपयांमध्ये मसाज आणि शरिर संबंध ठेवण्यासाठी तरूणी पुरविण्यात येईल असे त्या महिलेने सांगितले. त्यानंतर बोगस गिऱ्हाईक सलोनमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर बोगस गिऱ्हाईकाने साडेतीन हजार रुपये दलाल महिलेला दिले. येथील एका केबिनमध्ये गेल्यानंतर त्याने पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी सलोनवर छापा टाकला.

हेही वाचा… विचारस्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागेल! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलोनमध्ये एक छुपे केबिन तयार करण्यात आले होते. तिथे तरूणींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली आहे. तर दोन तरूणींची या वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.