ठाणे : शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे (७६) यांचे शनिवारी निधन झाले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून मोरे यांची ओळख होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी साभांळली होती.

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय असायचे. परंतु जिल्हाप्रमुख पदावर असतानाच त्यांचा अपघात झाला होता. त्यांना मोठी दुखापत झाली होती. तेव्हापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. काही दिवसांपूर्वीच रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद यांचा विरार येथील एका रिसाॅर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. रघुनाथ मोरे यांच्या पश्चात त्यांचे भाऊ, पुतणे, मुली, नातवंड असा परिवार आहे.

हेही वाचा – अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे हयात असताना रघुनाथ मोरे हे ठाणे शहरप्रमुख होते. आनंद दिघे यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. आनंद दिघे यांच्या सोबत प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली होती. रघुनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिवसैनिक घडले. जिल्हाप्रमुख पदावर असताना एका अपघातामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. या अपघातानंतर ते राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले. ते ठाण्यातील चंदनवाडी परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते.

हेही वाचा – टिटवाळ्यात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे हे ठाकरे गटात कार्यरत होते. त्यांचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या मझटकाने निधन झाले होते.  रघुनाथ मोरे यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. मोरे यांच्या निधनानंतर शिवसैनिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.