भाजपचे डोंबिवलीतील ज्येष्ठ, अभ्यासू नगरसेवक राजन सिताराम सामंत यांचे शुक्रवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून असा परिवार आहे. पक्षवाताचा झटका आल्याने गेल्या तीन वर्षापासून ते बिछान्याला खिळून होते.

हेही वाचा >>> डोंबिवली : एकाच घरात राहत असलेल्या नोकरदार मैत्रिणीकडून मैत्रिणीच्या पैशाची ऑनलाईन चोरी

राजन सामंत हे वैद्यकीय औषध विक्रेते होते. वीस वर्षापूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते मुळचे शिवसैनिक. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. कडोंमपात ते भाजपच नगरसेवक, परिवहन समिती सभापती होते. हिंदुत्ववादी, मलंग गड उत्सव समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा हिरीरिने सहभाग असायचा.

हेही वाचा >>> ठाणे : प्रबोधनकारांच्या विचारांमुळेच शिवसेनेसोबत युती ; संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवलीतील भाजपचे आखणीकार म्हणून ते ओळखले जात होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे ते खास समर्थक होते. पालिका, विधानसभा निवडणूक काळात भाजपची डोंबिवलीतील रणनीती आखण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.