आनंद दिघे : ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या विषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे. गुरुवारी टेंभीनाका येथे राऊत यांच्याविरोधात आंदोलनही झाले. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिंदे गटावर या प्रकरणावरून कडाडून टीका केलीआहे. निवडणूका जवळ आल्यानंतर शिंदे गटाला आनंद दिघे आठवतात. त्यांना कोणी मारले, हा विषय आणला जातो असा घणाघाती आरोप केदार दिघे यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप देखील केले.

ठाकर गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्याविरोधात टेंभीनाका येथे जोरदार निदर्शने केली. दरम्यान, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मात्र शिंदे गटावर टीका केली. ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या पण दिघे साहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित राहिला अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे असे केदार दिघे म्हणाले.

दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात 24 तास 365 दिवस लोकांच्या सेवेसाठी दिले. त्या दिघे साहेबांना स्वतःला देखील हे पटलं नसतं की आपल्या गुरु बरोबर वर त्यांची तुलना होईल. पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःच महत्त्व वाढवायचं हा एक केविलवाणा प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला. मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यानंतर दिघे साहेबांचा अवमान म्हणणारे ही लोकं दिघे साहेबांचा प्रवेशद्वार जो ठाणे नगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता तो अनेक वर्षापासून गायब आहे. तो असूनही बांधला नाही असे केदार दिघे म्हणाले.

प्रतिमेसमोर चपला घालून उभे असताना अवमान नाही का?

दिघे साहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत कुठेही अस्तित्वात आलं नाही. पण त्या बाबतीत दिघे साहेबांचा अवमान झाला अस यांना वाटत नाही. दिघे साहेबांच्या प्रतिमेच्या समोर ह्यांचेच नेते आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते खासदार (नरेश म्हस्के) आहेत ते पायामध्ये चपला घालून साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत होते. तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही

आनंद मठावर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी

एकनाथ शिंदे यांची आनंद मठाला पाटी लागली आहे. परंतु आम्ही ते आजही आनंद मठ मानतो. तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये तेव्हा दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही म्हणजे वेळोवेळी दिघे साहेबांचा अपमान ह्यांनी करावा पण त्यावेळेला दिघे साहेबांचा अवमान होत नाही. दिघे साहेबांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी यांनी कराव्या आणि या लोकांनी तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवाव असा आरोपही त्यांनी केला.

मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष

ठाणेकरांच्या मूळभूत प्रश्ना कडे दुर्लक्ष करायचं दैनंदिन दिवसांमध्ये ठाणेकरांना होणारा त्रास त्यांची होणारी घुसमट पडणारे खड्डे होणारा ट्रॅफिक जॅम कचऱ्याचा प्रश्न या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं पण दिघे साहेबांच नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायाचे असा आरोप केदार दिघे यांनी केला.