ठाणे – घोडबंदर भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसायला लागला आहे. या कोंडीत शाळेची बस एक ते दोन तास अडकून राहत असल्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यास तसेच घरी परतण्यास बराच कालावधीत जात आहे. विद्यार्थ्यांना होत असलेल्या या त्रासामुळे पालकवर्ग हैराण झाले आहेत. या कोंडीमुळे मुलांचे पूर्ण वेळापत्रक कोलमडत असल्याची खंत पालकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

घोडबंदर भागातील विविध ठिकाणी बड्या खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये घोडबंदर भागासह ठाणे शहरातील विद्यार्थी देखील शिक्षण घेतात. ठाणे मुख्य शहरापासून घोडबंदर परिसर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय बसची व्यवस्था आहेत. मागील काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीत बस अडकून राहत असल्यामुळे विद्यार्थी हैराण होत आहेत. सकाळच्या सत्रात शाळेत जाताना विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचतात. परंतू, दुपारी शाळेतून परतताना, त्यांना या कोंडीचा सामना करावा लागत आहे. या कोंडीत एक ते दीड तास अडकून राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागते. तसेच त्यांचे सर्वच वेळापत्रक कोलमडत असल्याची खंत पालकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. तर, दुपारच्यासत्रातील मुलांना या कोंडीमुळे शाळेत पोहोचण्यास उशिर होऊ लागला आहे. बस कोंडीत अडकत असल्यामुळे विद्यार्थांना बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. तर, अनेकदा काही शाळा व्यवस्थापकांकडून तुम्ही स्वत: आपल्या मुलाला शाळेत घेऊन या असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला

बस चालकांचे म्हणणे….

शाळेच्या एक ते दीड तास आधीपासून या बसेस शहरातील विविध भागात असलेल्या मुलांना घेऊन शाळेत जातात. तसेच त्यांना घरापर्यंत सोडतात. सर्व भागातील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेपर्यंत पोहोचण्यास अर्धा तासाचा अवधी लागतो. परंतू, घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास या प्रवासात जास्तीचा वेळ खर्चीक होत असल्याचे शालेय बस चालकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील रिजेन्सी इस्टेट, गृहसंकुलातील क्लब हाऊसला आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालक प्रतिक्रिया

आम्ही बाळकूम भागात राहतो. आमची मुलगी घोडबंदर भागात असलेल्या हावरे सिटी परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिची शाळा सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत असते. आमच्या घरापासून ही शाळा १० ते २० मिनीटाच्या अंतरावर आहे. परंतू, घोडबंदर भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा शाळेची बस अडकून राहते. त्यामुळे तिला शाळेत पोहोचण्यास किंवा घरी येण्यास फार उशिर होतो. त्यामुळे तिच्या शाळेच्या वेळेच्या तसेच अभ्यासाच्या दृष्टीकोनातून आम्ही तिच्या शाळेजवळील आसपासच्या परिसरात घर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. – शितल चव्हाण, पालक