ठाणे : पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून मुली व महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट १ ने अटक केली आहे. या टोळीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टोळीकडून हा प्रकार सुरू असून त्यांनी आतापर्यंत १७ मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे बाब तपासात समोर आले आहे. ठाण्यातून बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.

असलम शमी उल्ला खान (५४), सलीम जखरुद्दीन शेख (४५), साहेबलाल वजीर शेख उर्फ युसूफ बाबा (मांत्रिक) (६१), तौसिफ शेख (३०), शबाना शेख (४५), शबिर शेख (५३) आणि हितेंद्र शेट्टे (५६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये साहेबलाल वजीर शेख उर्फ युसूफ बाबा हा मुख्य आरोपी आहे. ठाण्यातून एक १६ वर्षीय मुलगी महिनाभरापुर्वी बेपत्ता झाली होती. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाकडून करण्यात येत होता. या तपासादरम्यान बेपत्ता झालेली मुलगी एका मैत्रीणीच्या घरी राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेचे आयोजन

पैशांचा पाऊस पाडण्याच्या बाहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे चौकशीत समोर येताच पोलिसांनी याप्रकरणातील सातजणांना अटक केली. या टोळीने आतापर्यंत १७ मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे बाब तपासात समोर आले असून त्यांनी आणखी असे प्रकार केले आहेत का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

गरीब आणि पैशांची गरज असलेल्या मुली आणि महिलांना ही टोळी हेरायची आणि त्यांना पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करायची. यावर विश्वास बसावा म्हणून ते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेल्या चित्रफित दाखवायचे. यामध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या बाजुला पैशांचा ढिगारा पडलेला आहे, असे चित्र दाखवायचे. अशा पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन पिडीत मुली आणि महिलेला दाखवून ते विधी करण्यासाठी तयार करायचे.

हेही वाचा…ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय

तसेच विधीदरम्यान पुजा करणारा किंवा तिथे हजर असलेल्या व्यक्तीच्या अंगात जीन येईल आणि विधीला बसलेल्या मुली व महिलेसोबत लैंगिक संबंध केल्यानंतर तो खुश होऊन करोडो रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडतो, असे पिडीत मुली आणि महिलांना सांगण्यात येत होते. अशाप्रकारे ही टोळी मुली व महिलांना पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.