ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असतानाही आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शिवसेनेचे माजी महापौर आणि नगरसेवकांसमवेत विकासकामांचा पाहाणी दौरा केला. या दौऱ्यावरून भाजपाने आयुक्तांसह शिवसेनेवर निशाणा साधत टीका केली आहे. आयुक्त शिवबंधनात अडकले आहे का? तसेच, शिवसेनेचे पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत. त्यास शिवसेनेने प्रत्युत्तर देत भाजपावर निशाणा साधला आहे. यामुळे आयुक्तांच्या दौऱ्यावरून आता शिवसेना आणि भाजपात जुंपल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोपरी भागात खाडी सुशोभिकरणाचे काम सुरु असून, या कामाबरोबरच अन्य कामांचा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. या दौऱ्याला माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे काही माजी नगरसेवक उपस्थित होते. या दौऱ्यावरूनच आता शिवसेना आणि भाजपामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असताना, आयुक्तांकडून निपक्षपातीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट असताना, तत्कालीन आयुक्तांनी कोणत्याही पक्षाला प्राधान्य देऊ नये या नियमाचे काटेकोरपणे पालन केले होते. परंतु विद्यमान आयुक्तांनी पाहणी दौऱ्यात शिवसैनिकांना निमंत्रित करून प्रशासकीय धक्का दिला. या दौऱ्याची केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली होती का? आयुक्तांच्या दौऱ्यावेळी पदाधिकारी कसे पोहचले? आयुक्तांनी शिवबंधन बांधले आहे का? असे प्रश्न भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी विचारले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp dispute over thane commissioners inspection tour of development works msr
First published on: 22-03-2022 at 14:43 IST