Ganesh utsav 2025 : ठाणे – शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३३व्या श्री गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, यात कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला “रान शिकवतोय” या सामाजिक भान असलेल्या देखाव्यासाठी प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणपूरक, सामाजिक संदेश देणारे देखावे, हिंदुत्वाची जाण आणि राष्ट्रीय भावना यांना विशेष महत्त्व देण्यात आले. ७ लाख रुपयांहून अधिक पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार आहेत.
शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सांस्कृतिक परंपरा पुढे नेत, आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली श्री गणेश दर्शन स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदा स्पर्धेचे ३३ वे वर्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर केला. यंदाच्या स्पर्धेत कळव्यातील ‘गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यांनी सादर केलेल्या ‘रान शिकवतोय’ या आशयघन देखाव्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, मंडळाला १ लाख रुपयांची रोख रकम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे नियोजन विलास जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल भोर, प्रमोद बनसोडे यांनी यशस्वीपणे पार पाडले.
स्पर्धेचा हेतू
या स्पर्धेच्या माध्यमातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक भान यांची जाणीव वाढविणे, तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि इको-फ्रेंडली शाडू मूर्तींचा प्रचार व प्रसार करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सव हे फक्त नयनरम्य सजावटीपुरते न राहता, समाजप्रबोधन व सांस्कृतिक उन्नतीचे माध्यम व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले जाते. खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही स्पर्धा निःपक्षपाती ठरावी यासाठी कोणत्याही मंडळाच्या सजावटीत सहभाग घेण्यात आलेला नाही.
परीक्षक आणि निर्णय प्रक्रिया
स्पर्धेसाठी ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञांचे परीक्षक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, प्रा. सुधीर चितळे, डॉ. सिमा हर्डीकर, श्री. अमोल त्रिंबक आपटे, ॲड. अनुराधा परदेशी यांच्यासह एकूण १८ परीक्षकांचा समावेश होता. त्यांनी पारदर्शक व निःपक्षपाती मूल्यांकन करून अंतिम निकाल निश्चित केला, असे म्हस्के यांनी सांगितले.
प्रमुख विजेते मंडळे:
प्रथम क्रमांक – गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा, देखावा – रान शिकवतो , १ लाख रुपये रोख पारितोषिक
द्वितीय क्रमांक – केदारेश्वर मित्र मंडळ, आनंदनगर, देखावा – आंतरजाल, ७५ हजार रुपये रोख पारितोषिक
तृतीय क्रमांक – ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, देखावा – डिजीटल मनी ट्रॅप, ५० हजार रुपये रोख पारितोषिक
चौथा क्रमांक – जय भवानी मित्र मंडळ, गोकुळनगर, देखावा – दहशतवाद, २५ हजार रुपये रोख पारितोषिक
पाचवा क्रमांक – शिवसम्राट मित्र मंडळ, देखावा – मंडळ आहे ना? , २१ हजार रुपये रोख पारितोषिक
सहावा क्रमांक – एकविरा मित्र मंडळ, महागिरी १५ हजार रुपये रोख पारितोषिक
सातवा क्रमांक – सार्वजनिक उत्सव मंडळ, जयभवानी , देखावा – संस्कृती विरूद्ध विकृती, १५ हजार रुपये रोख पारितोषिक
आठवा क्रमांक – उत्कर्ष मंडळ, हाजुरी* देखावा – हुंडाबळी (वैष्णवी हगवणे) १५ हजार रुपये रोख पारितोषिक
नववा क्रमांक – गोपाळ गणेश मंडळ आझाद नगर, देखावा – पर्यावरणहानी (स्वार्थी मनुष्यवृत्ती) १५ हजार रुपये रोख पारितोषिक
दहावा क्रमांक – कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड, देखावा – अवयवदान, १५ हजार रुपये रोख पारितोषिक
विशेष पारितोषिके:
उत्कृष्ट सजावटकार पारितोषिक
काजूवाडी वैतीनगर रहिवाशी मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक चौक, काजूवाडी, ठाणे – बद्रीनाथ मंदिर, रोख २५,०००/-
उत्कृष्ट श्री मुर्तीकार पारितोषिक
श्री नरेश पोहेकर – काजूवाडी गणेशोत्सव मंडळ (काजूवाडी मूर्ती) – रोख १०,०००/-
जय भवानी मित्र मंडळ, महाराष्ट्र नगर, वागळे इस्टेट, रोख १०,०००/-
उत्कृष्ट संहिता लेखन पारितोषिक
गणेश क्रिडा मंडळ, गणेश गल्ली, रोड नं २२ किसननगर नं ३, वागळे इस्टेट – रोख १०,०००/-
आदर्श गणेशोत्सव मंडळ पारितोषिक
श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, अहिल्यादेवी बागसमोर चरई, ठाणे – रोख रू १०,००/-
विशेष रोख पारितोषिक
१. शिवगर्जना मित्र मंडळ, वॉकरवाडी, उथळसर, ७ नं. शाळेचे मैदान, ठाणे – रोख १०,०००/-
२.डवलेनगर रहिवाशी सेवा संघ (गड संवर्धन)- रोख १०,०००/-
३. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव रोख १०,०००/-
४ बाल मित्र मंडळ (वागळेचा विघ्नहर्ता) (म- मराठी, म- महाराष्ट्र)- रोख १०,०००/-
५. शिवसाई मित्र मंडळ, केणीनगर, रोड नं. ३४, वागळे इस्टेट, ठाणे – -रोख १०,०००/-
६. ओंकारेश्वर सार्व. गणेशोत्सव मंडळ, प्लॉट नं.६६ जवळ, म्हाडा वसाहत, स्वा. सावरकर नगर, ठाणे – रोख १०,०००/-
७.स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, गणेश व्यासपीठ, संकल्प इंग्लिश स्कूल शेजारी, सावरकर नगर, ठाणे – रोख १०,०००/-
८.शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेवरा सर्कल, ठाणे
गुणवत्ता पारितोषिक
१.आई जिवदानी मित्र मंडळ, जोगिला मार्केट, उथळसर, ठाणे
रोख १०,०००/-
२.जिज्ञासा मित्र मंडळ, साळवी हाऊस, दगडी शाळेसमोर, चरई, ठाणे – रोख १०,०००/-
३.स्नेहांकित मित्र मंडळ, यश आनंद सोसायटी, विष्णूनगर, नौपाडा, ठाणे – रोख १०,०००/-
४.नवयुग मित्र मंडळ, कोपरी कॉलनी, पारशीवाडी, ठाणे (पूर्व)
रोख १०,०००/-
५.ओम सन्मित्र मंडळ, बबनराव पडवळ विद्यालयासमोर, पडवळ नगर, वागळे इस्टेट, ठाणे- रोख १०,०००/-
६.श्री साईबाबा मित्र मंडळ, किसन नगर नं. २. संजय गांधीनगर, रोड नं. १६, वागळे इस्टेट, ठाणे.- रोख १०,०००/-
७.बाल मित्र मंडळ (वागळेचा विघ्नहती) कोनार्क सोसायटी, श्रीनगर, सेक्टर ६ व ७, श्रीनगर, ठाणे- रोख १०,०००/-
८.डवलेनगर सार्व. गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य नगर पाडा नं.३. लोकमान्य बस डेपो मागे, ठाणे- रोख १०,०००/-
उत्तेजनार्थ पारितोषिक
१.श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, श्रीरंग विद्यालय, श्रीरंग सोसायटी, ठाणे – रोख १०,०००/-
२.विठ्ठल क्रिडा मंडळ, चैतीनगर, लोकमान्य पाडा नं. ३. ठाणे.
रोख १०,०००/-
३.साई पिंपळ मित्र मंडळ, बिल्डींग नं. ११, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) – रोख १०,०००/- ४.सिंधुरत्न मित्र मंडळ, भवानी चौक, शांतीनगर, रोड नं. २७. वागळे इस्टेट, ठाणे – रोख १०,०००/-