कल्याण – कल्याण पूर्वेत राहत असलेल्या २५ वर्षाच्या साॅफ्टवेअर इंजिनिअरची दोन महिलांनी अर्धवेळ ऑनलाईन नोकरी देण्याचे आमिष दाखवून गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत ४० लाख ४० हजार ३०० रूपयांची फसवणूक केली आहे.प्रतिक अरविंद सिंग (२५, रा. माधुरी हॅप्पीहोम, हनुमाननगर, कल्याण पूर्व) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रिया आणि अविका मिश्रा अशी आरोपी महिलांची नावे आहेत. ६ जून ते १६ जून या मागील दहा दिवसांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रतिक सिंग याने तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, प्रतिक सिंग हा साॅफ्टवेअर इंजीनिअर आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी प्रतिक घरी असताना त्यांना प्रिया आणि अविका मिश्रा या दोन् महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन माध्यमातून अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

हेही वाचा >>> ठाण्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी; माजिवाडा उड्डाणपुलासह खारेगाव टोलनाका भागात खड्डे

घरबसल्या अर्धवेळ नोकरी मिळते म्हणून प्रतिकने या महिलांच्या संपर्काला प्रतिसाद दिला. आरोपी महिलांनी प्रतिकला व्हाॅट्सप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून त्यांना एक जुळणी पाठवली. या जुळणीच्या (लिंक) माध्यमातून एक गुंतवणुकीचे साधन पाठवून त्या माध्यमातून प्रतिकला टप्प्याने गुंंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक साधनाचा गुणांक वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन आरोपी प्रिया, अविका यांनी प्रतिकला दिले. अशाप्रकारे गोडबोलून या भामट्या महिलांनी प्रतिकच्या कल्याण पूर्वेतील सूचकनााका येथील एचडीेएफसी बँकेतून स्वताच्या संशयित बँँक खात्यात ४० लाख ४० हजार ३०० रूपये गुंतवणूक वळते करून घेतले.

हेही वाचा >>> मुंब्रावासियांचा पाण्यासाठी तिरडी मोर्चा; संतप्त नागरिकांनी फोडली मडकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढ्या मोठ्या गुंतवणुकीवर तातडीने नफा मिळत असल्याने प्रतिक त्या नफ्याची मागणी आरोपी महिलांकडे करू लागला. परंतु, त्या महिलांनी प्रतिकच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास अर्धवेळ नोकरी नाहीच पण गुंतवणूक केलेल्या रकमेवर अधिकचा परताना मिळत नाही. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम आरोपी महिला परत करत नाहीत. हे उशिरा लक्षात आल्यावर प्रतिकला आपली फसवणूक या महिलांनी केले असल्याचे निदर्शनास आले. कोळसेवाडी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने याप्रकरणी गु्न्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या महिनाभरात कल्याण, डोंबिवलीतील दहाहून अधिक नागरिकांची भामट्यांनी ऑनलाईन गुंतवणुकीतून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे.