लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या १० प्राथमिक शाळा कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून मंगळवारी घोषित केल्या. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी केले आहे.

मागील वर्षी शिक्षण विभागाने पालिका हद्दीतील सात शाळा अनधिकृत म्हणून घोषित केल्या होत्या. अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये डोंबिवलीतील खंबाळपाडा, ९० फुटी रस्त्यावरील ओमकार इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), ध. ना. चौधरी विद्यासंकुल, नांदिवली रोड, डोंबिवली, विबग्यार राईझ स्कूल(सीबीएसई), वसंत व्हॅली रोड, कल्याण पश्चिम, ईकरा इंग्रजी स्कूल ॲन्ड मक्तब, सर्वोदय सृष्टी, कल्याण पश्चिम, लिटल वंडर प्रायमरी स्कूल, मांडा टिटवाळा, दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल, बिर्ला काॅलेज रस्ता, कल्याण पश्चिम, डी. बी. एस. हिंदी ॲन्ड इंग्लिश स्कूल, संतोषी माता मंदिराजवळ, आंबिवली पश्चिम यांचा समावेश आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये हाॅटेल मालकावर तलवारीने हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शाळा अनधिकृत घोषित केल्याने पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश घेऊ नयेत. अधिकृत शाळा प्रवेशासाठी काही अडचण असेल तर पालकांनी पालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी सरकटे यांनी केले आहे.