ठाणे: भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने बुधवारी शहराच्या काही भागाचा पाणी बंद राहणार आहे.

 मुसळधार पावसामुळे भातसा नदीला पूर येत आहे. या पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ अडकला आहे. यामुळे महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून यामुळे कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथे पाण्याची गळती होत असून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा मात्र सुरु राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर पंप हाऊसवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार तसेच उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या बंदमुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेने दिली.