ठाणे : मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो. पण मागील पाच वर्षांपासून ठाण्यातील खारेगाव पूलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. ठाण्यातील समस्या संपल्या नाही तर ठाणेकरांना एकत्र करून मोठा लाँग मार्च काढू असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
ठाण्यात मोठ्याप्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रश्नावर मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी वाहतुक समस्येविषयी प्रशासनाला धारेवर धरले. आम्ही वाहतुकीची शिस्त पाळली नाही. तर आम्हाला चलान करुन दंडात्मक कारवाई केली जाते. घोडबंदर मार्गावरुन अवजड वाहने गेल्यास त्यांच्यावर कारवाई होत नाही. शिस्त फक्त गरीबांनी पाळायची का असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमच्याकडून रस्त्याचे कर घेतात. मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केले तर कारवाई का केली जाते. आम्हाला व्यवस्थापन पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंची उत्तम व्यवस्था का नाही केली. महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहन तळ बांधले. परंतु तेथेही पे-अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तयार होतो. पण मागील पाच वर्षांपासून ठाण्यातील खारेगाव पूलाचे काम पूर्ण होत नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे. येत्या काही दिवसांत ठाण्यात हे सर्व थांबले नाही. तर आम्ही मोठा लाँग मार्च काढू असा इशारा जाधव यांनी दिला.
पैसे खाण्यासाठी ठाण्यात टेंडर
- ठाण्यात फक्त पैसे खाण्यासाठी कामांची टेंडर काढले जातात. ठाणेकरांसाठी ते टेंडर नाहीत. ठाण्याचा विकास थांबलेला आहे, अनेक समस्या वाढल्या आहेत. ठाण्यात एक पूल झालेला नाही. घोडबंदरवर खड्डे झालेत. निधी आला म्हणून वापरायचा इतकेच होते. मूळ ठाणेकरांना काय मिळाले हे दाखवावे असेही ते म्हणाले.
तर मंत्रीपद कशासाठी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, की ठाण्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवा. जर ठाण्यात वाहतुक कोंडीची समस्या नाही असे जर त्यांना वाटत असेल तर तुम्हाला लखलाभ असा टोलाही जाधव यांनी लगावला. उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देखील होते. मागील ११ वर्षांपासून ते कोणत्या ना कोणत्या खात्याचे मंत्री होते. परंतु ठाणेकरांचे समाधान होत नसेल तर हे मंत्रीपद कशाला हवे असा प्रश्नही त्यांनी केला. ठाण्यात वाहतुक कोंडी, रस्ते खराब, अवजड वाहनांची वाहतुक यामुळे ठाणेकर त्रस्त झाल्याची टीकाही त्यांनी केली.
शस्त्रक्रियेचा फायदा फक्त शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी त्यांच्या भाषणात अडीच वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया केली असा उल्लेख करत असतात. यावर अविनाश जाधव म्हणाले की, या शस्त्रक्रियेचा ठाणेकरांना काय फायदा झाला. हा फायदा फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना झाला असा टोलाही त्यांनी लगावला.