शहापूर : येथील नडगाव भागात पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मुल होत नसल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – कल्याण : आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर ;आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामे रखडणार असल्याने वाहन मालक अस्वस्थ

हेही वाचा – विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरेश उघडे (२८) आणि निलम उघडे (२५) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. नडगाव येथील बेलपाडा परिसरात ते वास्तव्यास होते. आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. गुरुवारी त्यांचा मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखळ झाले. मुल होत नसल्याने त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.