ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार हजार प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच १५५ अवैध शस्त्र जप्त करण्यात आले असून यातील १७ अग्निशस्त्र आणि ४० काडतूसे आहेत. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ४ हजाराहून अधिक बुथ आणि ९५३ मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे सुमारे ७ हजार पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात असणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. तर, उर्वरित नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील भाग येतो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांचा सुमारे आठ हजारांचा बंदोबस्त आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक यासह सुमारे सात हजारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ९२ बुथ असणार आहेत. तर ९५३ मतदान केंद्र आहेत. येथेही कडेकोट फौजफाटा तैनात असेल.

nadda and kharge
धार्मिक भावना दुखवू नका ! संविधानावर बोलू नका !! नड्डा, खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र
Narendra Modi speeches emphasize Congress polarizing issues more than development
मोदींच्या भाषणांत विकासापेक्षाही काँग्रेस, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर जोर; पाच टप्प्यांत १११ भाषणे
bjp vs tmc kolkata high court
उच्च न्यायालयाचा भाजपाला दणका, तृणमूलविरोधातील अपमानजनक जाहिरातींवर बंदी; निवडणूक आयोगालाही खडसावलं
Preventive action, criminals,
निवडणुकीमुळे ३१३ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, नाशिक शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
Supreme Court, reforms,
यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये वाढ; जानेवारी-एप्रिलदरम्यान साडेनऊ हजारांहून अधिक कारवाया
nashik lok sabha seat, Onion export ban, PM Narendra Modi's scheduled meeting, narendra modi in nashik, Narendra modi public meeting nashik, Opposition criticizes, nashik onion hub, dindori lok sabha seat, Bharati pawar, pimpalgaon baswant, mahayuti, lok sabha 2024,
पंतप्रधानांच्या नियोजित सभेमुळे कांदा निर्यातबंदी शिथिल – विरोधकांची टीका, भाजपचेही प्रत्युत्तर
pimpri chinchwad cash seized marathi news, rupees 1 crore 20 lakh cash seized in pimpri chinchwad
मावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वा महिन्यात सव्वाकोटीची रोकड जप्त

हेही वाचा – माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन

ठाणे पोलिसांनी मागील महिन्याभरापासून रात्री तसेच दिवसा गस्ती घालून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. या कारवायांत पोलिसांनी १५५ प्राणघातक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये १७ अग्निशस्त्रांचा सामावेश आहे. तसेच निवडणुकांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४ हजार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १२ जणांविरोधात तर अवैध मद्य विक्रीच्या २३४ कारवाया केल्या आहेत. राज्यात गुटखा विक्री करण्यास प्रतिबंध आहे. गुटखा वाहतुकीच्या १७ जणांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – “मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती”, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नार्को – को-ऑर्डिनेशन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मिरा भाईंदर, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा आरोग्य, वन विभाग यासह इतर शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. यावेळी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या अमली पदार्थावर करडी नजर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.