ठाणे : उपवन येथील स्वामी समर्थ मठ परिसरात ३६ वर्षीय महिलेला ढकलून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या युगेश यादव (३४) या चोरट्याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसूत्र जप्त केले आहे.

हेही वाचा – वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम

हेही वाचा – उमेदवारांची आंदोलक, गुंतवणूकदारांना साद; बदलापूर अत्याचार, सागर इन्व्हेस्टमेंट प्रकरणातील संबंधितांना पाठिंब्यासाठी हाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपवन भागात ३६ वर्षीय महिला वास्तव्यास आहेत. सोमवारी त्या स्वामी समर्थ मठ परिसरात जंगलातील वाटेने पायी जात होत्या. त्याचवेळी युगेश यादव हा त्याठिकाणी आला. त्याने महिलेला ढकलले. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी हा रामनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, उपनिरीक्षक व्हि.जे. चिंतामण यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणी युगेश याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे.