शहरातील मुख्य रस्त्यांवरील उड्डाण पुल, संरक्षक भिंती आणि चौकांमध्ये विविध संकल्पेनेतून रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणांची कामे सुरु असतानाच, दुसरीकडे पालिकेच्या परवानगी शहरातील चौक आणि रस्त्यांलगत उभारण्यात आलेल्या फलकांच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा फलकबाजीला रोखण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीरात विभागाचे उत्पन्न वाढविण्यावर देण्यात येणार असला तरी जाहीरात फलकांच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>कडोंमपा पालिका शाळेत ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश

करोना काळापासून ठाणे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून ही परिस्थिती आजही कायम आहे. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची अपेक्षित कर वसुली होत असून यंदा ५९९ कोटी ७३ लाख रुपयांची आतापर्यंत करवसुली झाली आहे. ३१ मार्चपर्यंत ६७७ कोटी २७ लाख रुपये इतकी कर वसुली होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या उद्देशातून जाहीरात विभागाकडून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यात शौचालय उभारणी, उद्यान विकसित करणे या बद्दल्यात जाहीरात हक्क देणे अशा योजनांचा समावेश आहे. याशिवाय, फिरते जाहीरात वाहने अशी योजनाही पालिकेने राबविली होती. या अंतर्गत शहरातील चौक आणि रस्त्यांलगत मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले असून महामार्गालगत फिरती जाहीरात वाहने उभी करून ठेवण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्येही जाहीरात फलक उभारण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी फलकांचा अतिरेकपणा झाला असून यामुळे त्या भागाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा फलकबाजीला रोखण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.

हेही वाचा >>>उत्पन्न मिळवण्यात उल्हासनगर महापालिका नापास; मालमत्ता करवसुली २३ टक्के, विकास शुल्क ६ टक्केच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिकेच्या विविध योजनेंतर्गत ठेकेदारांनी शहरात उभारलेल्या फलकांवर जाहीराती लावण्यात येत असून त्या जाहिरातींपोटी पालिका ठेकेदारांकडून शुल्क आकारते. त्यापोटी २०२०-२१ या वर्षात पालिकेला ७७ कोटी ३ लाख रुपये तर २०२१-२२ या वर्षात ६१ कोटी ३ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. परंतु करोना काळात जाहीरात विभागामार्फत देण्यात आलेल्या सवलतींमुळे या विभागाच्या उत्पन्नात घट झालेली असतानाच, यंदाच्या वर्षीही या विभागाचे उत्पन्न घटले आहे. गेल्यावर्षी २२ कोटी ३७ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु यंदा ८ कोटी १५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षी १४ कोटी ३८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असले तरी या जाहिरातबाजीच्या अतिरेकामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.