ठाणेकरांची चौपाटी अशी ओळख असलेल्या तलावपाळी परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. वर्षानुवर्षे या ठिकाणी असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करुन त्याचा खाऊगल्ली म्हणून विकास करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी केली. या दौऱ्यास अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके हे उपस्थित होते. तलावपाळी परिसर ठाणे शहराचा मानबिंदू समजला जातो. ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या परिसरात नागरिक सकाळ आणि सायंकाळी फेटफटका मारण्यासाठी येतात. या नागरिकांना परिसरात मोकळेपणाने फिरता यावे यासाठी हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात यावा. वर्षानुवर्षे या ठिकाणी असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन कायम रहावे यासाठी फेरीवाल्यांकरिता पर्यायी जागा निश्चित करुन त्याचा खाऊगल्ली म्हणून विकास करावा, असे आदेश बांगर यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- ठाणे महापालिकेतील कार्यालय वापरण्यास बंदी घाला अन्यथा आंदोलन करू: शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांचा इशारा

संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी करुन नागरिकांना बसण्यासाठी असलेले कठडे दिवसातून किमान दोन वेळा धुवून स्वच्छ करुन परिसर नीटनेटका राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तलावाभोवती असलेले सुशोभित विद्युत खांबांची आवश्यक देखभाल करुन ते कायमस्वरुपी सुस्थितीत राहतील. तसेच संपूर्ण तलावाभोवती आतील बाजूस एलईडी दिवे लावण्यात यावे, जेणेकरुन त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून या परिसराच्या सुशोभिकरणात भर पडेल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सचूनाही त्यांनी दिल्या. तसेच पाणपोईलगतची जागा स्वच्छ राहिल आणि पाणपोईची पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करुन शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. या ठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत दिवे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मात्र तलावपाळीच्या आजूबाजूचा परिसर कोणत्याही परिस्थितीत फेरीवाला मुक्त राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे स्टेशन परिसर, तलावपाळी परिसर, नागरिकांची सार्वजनिक वावर असलेली ठिकाणे कायमस्वरुपी मोकळी राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. सदर परिसर अतिक्रमणमुक्त करताना थातुरमातुर कारवाई न करता ठोस कारवाई करावी, जेणेकरुन एकदा कारवाई झाल्यावर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- ठाणे पोलिसांकडून अल्पवयीन चालक आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन; समुपदेशनामुळे नियमांचे उल्लंघन करणारेच बनले वाहतूक जनजागृतीचे दूत

भित्तीपत्रके तातडीने काढून टाका

तलाव परिसरामध्ये ठिकठिकाणच्या भिंती, उड्डाणपुलाचे खांब, विद्युत ङिपी व कठड्याला जाहिरात पत्रके चिटकविल्याचे दिसून आले, यामुळे या ठिकाणच्या सुशोभिकरणाला बाधा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. तरी संपूर्ण तलाव परिसरातील भित्तीपत्रके तातडीने काढून आगामी काळात कोणतीही भित्तीपत्रके लागणार नाही याची दक्षता घेवून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.

हेही वाचा- ठाणे : ९९ लाख रुपयांचे कापड चोरले, परंतु पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरील स्टिकरमुळे चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवा

ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज ६ ते ७ लाख प्रवाशी प्रवास करतात. पश्चिमेकडील बाजूस ७० टक्के तर पूर्वेकडील बाजूस ३० टक्के प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस या परिसरात गर्दी असते. या नागरिकांना सुलभतेने ये-जा करता यावी या दृष्टीने १५० मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी उपायुक्तांना दिले.