चोरीचा माल गोदामातून काढण्यासाठी तीन ते चार ट्रकचा वापर केल्याचे उघड 

भिवंडी येथील खोणीगाव भागातून चोरट्यांनी ९९ लाख रुपयांचे कापड चोरी केले. हे कापड एका गोदामातून दुसरीकडे नेण्यासाठी तीन ते चार ट्रकचा वापर करण्यात आला. कापड चोरी केल्यानंतर चोरट्यांनी गोदामातील सीसीटीव्ही चित्रीकरणही नष्ट केले. परंतु गोदामात पडलेल्या रिकाम्या बाटल्यांवरील कंपनीच्या स्टिकरमुळे चोरट्यांचे पितळ उघडे पडले. चोरट्यांनी चोरलेला सर्व कापड पोलिसांनी जप्त केले असून मुख्य आरोपीला अटकही केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा >>> ठाणे पोलिसांकडून अल्पवयीन चालक आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन; समुपदेशनामुळे नियमांचे उल्लंघन करणारेच बनले वाहतूक जनजागृतीचे दूत

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

खोणीगाव येथील मिठपाडा रोड परिसरातील एका गोदामात ९९ लाख ३९ हजार २६० रुपयांचे कापड आणि पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही डिव्हीआर चोरीला गेले होते. या घटनेप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतक्या मोठ्याप्रमाणात कापड चोरीला गेल्याने भिवंडी परिमंडळाचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी तपास पथके तयार केली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्य पदार्थांची पाकिटे आढळून आले. त्या पाण्याच्या बाटल्यांवर बाटली बनविणाऱ्या कंपनीच्या नावाचे स्टिकर होते. पोलिसांनी तात्काळ परिसरातील विविध दुकाने, उपाहारगृहात जाऊन संबंधित कंपनीच्या बाटल्या कोणत्या दुकानात विक्री केल्या जात आहेत याची माहिती घेतली. त्यावेळी एका उपाहारगृहाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उपाहारगृहाचे सीसीटीव्ही तपासले त्यावेळी एका सीसीटीव्ही चित्रीकरणात रेकाॅर्डवरचा गुन्हेगार परशुराम सरवदे हा पाण्याच्या बाटल्या खरेदी करताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सरवदेचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांना तो नारपोली भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सरवदेला नारपोली येथील अण्णाभाऊ साठे नगर परसिरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला याप्रकरणात अटक केली आहे.

हेही वाचा >>> खळबळजनक! पाण्याच्या टाकीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

सरवदे याने हा गुन्हा त्याच्या आणखी काही साथिदारांसोबत केला आहे. कापड चोरल्यानंतर ते भिवंडीतील अंजुर दिवे या गोदामात ठेवण्यात आले होते. इतक्या मोठ्या कापडाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी तीन ते चार ट्रकही आणले होते. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी त्या गोदामातून चोरी केलेला कापड आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केले आहे.