लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहरातील रस्ते सफाई कामाचा दर्जा वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेने दोन यंत्र वाहने खरेदी केली असून या वाहनांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वाहनांद्वारे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट या परिसरात सफाई सुरू करण्यात आली आहे. आणखी चार वाहने पालिकेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची मानवी पद्धतीने सफाई करण्यात येते. अनेक रस्त्यांची योग्यप्रकारे सफाई होत नसल्याची टिका नागरिकांकडून सातत्याने होत आहे. हि बाब ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान निदर्शनास आली होती. यानंतर त्यांनी ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले होते. परंतु वारंवार सुचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्यामुळे त्यांनी काही ठेकेदारांना नोटीसा बजावल्या होत्या. अखेर यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला होता.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभीकरण अशी कामे सुरू आहेत. याच मोहिमेतंर्गत ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी सहा सफाई यंत्रे घेण्यात येणार आहेत. पैकी दोन वाहने पालिकेच्या ताफ्यात दाखल झाली असून त्याचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या वाहनांद्वारे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई करण्यात येणार आहे. यांत्रिक पद्धतीने सफाईमध्ये यंत्राची देखभाल आणि दुरूस्ती हा कळीचा मुद्दा असतो.

हेही वाचा… VIDEO : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाणीवर केदार दिघे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “षडयंत्र रचून…”

यंत्र नवीन असताना जी कार्यक्षमता असते, ती यंत्र जुनी व्हायला लागल्यावर कमी होणे अपेक्षित नाही. त्यामुळे, संपूर्ण कालावधीत सफाईची कार्यक्षमता समान राहील, देखभाल आणि दुरुस्ती अत्युच्च दर्जाची राहील, अशा सूचना कंत्राटदारास देण्यात आल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. यांत्रिक सफाईमुळे रस्त्यावरील कचरा उचलण्यास मदत होईल. तसेच, रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असलेली धूळ साफ करण्यास मोठी मदत होईल. महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, कॉंक्रिटचे रस्ते यांची सफाई या पद्धतीने करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… Mira Road Murder : मनोज सानेने ‘या’ पदार्थात किटकनाशक मिसळून केली सरस्वतीची हत्या, पोलिसांनी दिली माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते सफाईचे एक वाहन दिवसभरात सुमारे ४० किमी रस्त्यांची सफाई करू शकेल. या वाहनांमुळे शहरातील मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होण्यास मदत होईल. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम ही वाहने करतील. त्याचबरोबर शहरातील छोट्या गल्ल्यांमध्ये साफसफाई व्हावी, या दृष्टीने लहान विद्युत वाहने आणण्याचाही विचार आहे. यांत्रिक पद्धतीने केली जाणारी सफाई ही मनुष्यबळाचा वापर करून होत असलेल्या सफाईला पर्याय ठरू शकत नाही. परंतु, यांत्रिक पद्धतीने सफाई सुरू केल्यामुळे त्या ठिकाणचे मनुष्यबळ इतर रस्त्यांवरील सफाईसाठी वापरणे शक्य होईल. जेणेकरून मनुष्यबळाद्वारे केल्या जाणाऱ्या सफाईची कार्यक्षमता वाढवता येईल, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.