Thane Municipal Corporation : ठाणे : करोनानंतर म्हणजेच गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेली ठाणे महापालिका मॅरेथॉन स्पर्धा यंदाच्या वर्षांपासून सुरू करण्यात आली असून ही स्पर्धा रविवार, १० ऑगस्ट रोजी होणार आहे.’ मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची ‘ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास २५ हजारांहून अधिक धावपट्टू धावणार आहेत. या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर विविध मार्ग तयार करण्यात आले असून या मार्गावर स्पर्धेसाठी वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका मॅरेथॉन स्पर्धेला रविवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय चौकातून प्रारंभ होणार असून ही स्पर्धा विविध १२ गटात घेण्यात येणार आहे. यंदाही २१ किमी पुरूष आणि महिला, १८ वर्षावरील १० किमीच्या स्पर्धेसाठी वेळ निश्चिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या स्पर्धेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धकांसाठी ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या काळात कोणताही अपघात होऊ नये आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत. तशी अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी काढली आहे. यानुसार, पहाटे ५ वाजेपासुन मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. ही अधिसचुना पोलीस वाहने, रूग्ण वाहिका, अग्निशमन वाहन आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच मरेथॉन स्पर्धेतील वाहनास लागू राहणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक बदल

नितीन कंपनी सिग्नल कडून महापालिका भवन मार्गे अल्मेडा चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितीन कंपनी सिग्नल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील उजव्या किंवा डाव्या बाजूस वळण घेऊन कॅडबरी जक्शन खोपट किंवा तीनहात नाका सिग्नल मार्गे इच्छित स्थळी जातील. अल्मेडा सिग्नल कडून महानगर पालिका भवन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अल्मेडा सिग्नल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने एलबीएस रस्त्याने खोपट किंवा संत गजानन महाराज चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

नितीन कंपनी सेवा रस्त्याने तीनहात नाक्या कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितीन जंक्शन येथे प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. तसेच तीनहात नाका सेवा रस्त्याने नितीन कंपनी कडे जाणऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तीनहात नाका सेवा रस्त्यावर येण्यास ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व वाहने ही पूर्व द्रुतगती महामार्गाने (हायवे मार्गे ) इच्छित स्थळी जातील. तीनहात नाका, हरिनिवास सर्कल, तीन पेट्रोल पंप, संत गजानन महाराज चौक, दगडी शाळा, ज्योती स्टोअर्स, सेंट जॉन स्कूल पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे.

तीनहात नाका ते हरिनिवास सर्कल मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने तीनहात नाक्यावरील रघुवेल हॉटेल, टेलीफोन नाका, गोखले रोड मार्गे गावदेवी मंदीरा कडून शिवाजी पथ मार्गे इच्छित स्थळी जातील. विष्णु नगर घेटाळी नौपाडा परिसरातील वीर सावरकर मार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहने ही राम मारुती रस्त्याने आयसीआयसीआय बँके जवळील चौकातून नमस्कार हॉटेल (हॉटेल ग्रिन लिफ) मार्गे इच्छित स्थळी जातील. अल्मेडा चौकाकडून संत गजानन महाराज चौक मार्गे टिळक चौकाकडे जाणारी वाहने ही संत गजानन महाराज चौक आयसीआयसीआय बँक नमस्कार हॉटेल (हॉटेल ग्रिन लिफ) मार्गे इच्छित स्थळी जातील. दगडी शाळा येथून सेंट जॉन हायस्कूलकडे जाणारी वाहतूक दगडी शाळा येथे बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक गजानन महाराज चौकातून अथवा अल्मेडा चौकातून इच्छित स्थळी जातील.

चिंतामणी ज्वेलर्स कडून मालतीबाई चिटणीस हॉस्पीटल कडे जाणारा मार्ग चिंतामणी ज्वलर्स येथे बंद करण्यात येणार आहे. कोपरी सर्कल कडून एमजी रस्त्याने टेलिफोन नाका कडे येणारी वाहने हि कोपरी पुला वरून गुरुद्वारा येथील सेवा रस्त्याने तीनहात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. टॉवर नाका आणि डॉ. मुस चौक बाजू कडून गडकरी सर्कल मार्गे अल्मेडा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना गडकरी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व वाहने डी. मुस चौक थवा साई कृपा हॉटेल, राम मारुती रस्त्याने इच्छित स्थळी जातील. सतरंज वेफर्स ते महानगर पालिका भवन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सतरंज वेफर्स येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने हॉटेल तंबी समोरून उजवे वळण घेऊन आराधना मार्गे किंवा सतरंज वेफर्स समोरून सर्व्हिस रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

कौशल्य रुग्णालयाकडून येणाऱ्या सर्व वाहनांना कौशल्या कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने सेवा रस्त्याने कॅडबरी खोपट मार्गे इचिडत स्थळी जातील. नुरी बाबा दर्गा येथुन ठाणे महापालिका सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नुरी बाबा दर्गा कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने अल्मेडा सिग्नल तसेच एसटी वर्कशॉप मार्गे इच्छित स्थळी जातील. सर्व जड वाहने तसेच बसगाड्या तीनहात नाका हरिनिवास तिन पेट्रोलपंप मार्गे इच्छित स्थळी जातील.

वागळे इस्टेट भागातील वाहतूक बदल

ज्ञानेश्वरनगर आणि आंबेवाडीकडून कामगारनाका येथून यशोधननगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कामगारनाका कट येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने कामगार नाका येथुन सरळ जावून इंदिरानगर नाका येथून उजवीकडे वळुन पुढे इच्छीत स्थळी जातील. यशोधन नगर परिसरातील आणि लोकामान्यनगरकडून कामगार नाका दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना यशोधननगर चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने यशोधनगर चौकातुन लोकमान्यनगर बस डेपो येथुन डावीकडे वळुन इंदिरानगर नाका येथून पुढे इच्छित स्थळी जातील. आई माता चौक परिसरातील आणि वर्तकनगर कडील सर्व प्रकारच्या वाहनांना आईमाता चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने आईमाता चौकातुन महात्माफुले नगर, आर.जे. ठाकुर कॉलेज कट येथुन डावीकडे वळून पुढे इच्छीत स्थळी जातील.

कळव्यात वाहतूक बदल

कळवा नाक्याकडुन पारसिक सर्कलकडे जाणाऱ्या हलक्या, मध्यम, जड आणि अवजड (चार चाकी वगळून) वाहनांना कळवा नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने कळवा नाका येथुन जुन्या ब्रिज वरुन क्रिक नाका मार्ग इच्छीत स्थळी जातील. पारसिक सर्कल कडून कळवा नाक्याकडे येणाऱ्या हलक्या, मध्यम, जड आणि अवजड (चार चाकी वगळून) वाहनांना पारसिक सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने पारसिक सर्कल येथुन पुढे सरळ खारेगाव टोल नाका मार्गे इच्छीत स्थळी जातील. नवीमुंबई कडून कळवा चौक मार्गे ठाणे सिडको कड़े जाणाऱ्या एन.एम.एम.टी व खाजगी बसगाड्यांना विटावा नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. एन.एम.एम.टी आणि खाजगी बसगाड्या विटावा नाका येथेच प्रवासी उतरवून परत जातील. क्रिक नाक्याकडुन जो.पी. ओ. खोपट, मिनाताई ठाकरे चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना क्रिक नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने क्रिक नाका, राबोडी वाहतूक उप विभाग महालक्ष्मी येथुन पुढे इच्छीत स्थळी जातील.

उथळसर भागात वाहतूक बदल

गोल्डन नाका हनुमान मंदिरा कडुन फ्लॉवर व्हॉली मार्गे कॅडबरी कडे जाणाऱ्या सेवा रस्ता सर्व वाहनांना हनुमान मंदिर येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. ही वाहने सरळ पुढे जावुन गोल्डन कॉस येथे डावे बाजुस वळण घेवुन स्लिप रोडने नाशिक मुंबई महामार्गा वरुन इच्छीत स्थळी जातील. जांभळी नाका, टेंभी नाका, सिव्हील कॉर्नर खोपट, मिनाताई ठाकरे चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टेंभी नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील ठाणे स्टेशन येथुन येणाऱ्या टि.एम.टी. व एन.एम.एम.टी. च्या बसगाड्या नितीन कंपनी मार्गे इच्छित स्थळी जातील.

जांभळी नाका, टेंभी नाका, सिव्हील कॉर्नर खोपट, मिनाताई ठाकरे चौकाकडे जाणारी वाहने टेंभी नाका येथून कोर्टनाका मार्गे जावून पुढे इच्छित स्थळी जातील. टिळक चौक चौक, उथळसर, वीर सावरकर मार्ग, जैन मंदीर, सिव्हील हॉस्पिटल कॉर्नर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मिनाताई ठाकरे चौक, गोल्डन डाईज नाक्यापर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मिनाताई ठाकरे चौकाकडून ठाणे स्थानक आणि नौपाडा परिसरात जाणारी वाहने हि मिनाताई ठाकरे चौक के व्हिला जी. पी.ओ. कोर्ट नाका मार्गे अथवा मिनाताई ठाकरे चौक एलबीएस रस्त्याने खोपट जंक्शन, अल्मेडा चौक, संत गजानन महाराज चौक, राम मारुती रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

खेवरा सर्कल भागात वाहतूक बदल

बिरसा मुंडा चौकाकडुन गांधी नगर कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बिरसा मुंडा चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरून गांधीनगर चौकाकडे जाणारे वाहनांसाठी गांधीनगर कडुन बिरसा मुंडा चौकाकडे येणारी वाहीनी दुहेरी करण्यात येत असून येथून वाहने इच्छीत स्थळी जातील. गांधी नगर चौकाकडून गॅल्डी अलवारीस रस्त्याने काशिनाथ घाणेकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारचे वाहनांना गांधीनगर चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरुन गांधीनगर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गांधीनगरकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे चौकाकडे येणारी वाहीनी दुहेरी करण्यात येत आहे.

बिरसा मुंडा चौकातुन पवारनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सर्व वाहनांना बिरसामुंडा चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. बिरसा मुंडा चौकातुन पवारनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पवारनगर कडुन बिरसामुंडा चौककडे येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असुन या वाहिनीवरून वाहने इच्छित स्थळी जातील. वसंत विहार चौकातुन काशीनाथ घाणेकर चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सर्व वाहनांना वसंत विहार चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. काशीनाथ घाणेकर चौकाकडुन वसंत विहार चौककडे येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असुन या वाहिनीवरून वाहने इच्छित स्थळी जातील. काशीनाथ घाणेकर चौकातुन खेवरा सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सर्व वाहनांना काशीनाथ घाणेकर चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे.

खेवरा सर्कलकडुन काशीनाथ घाणेकर चौककडे येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून या वाहिनीवरून वाहने इच्छित स्थळी जातील. खेवरा सर्कलकडुन टिकुजीनीवाडी सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सर्व वाहनांना खेवरा सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. टिकुजौनीवाडी सर्कल कडुन खेवरा सर्वांलच्या दिशेने येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून या वाहिनीवरून वाहने इच्छित स्थळी जातील. टिकुजीनीवाडीकडुन मुल्लाबाग निलकंठ ग्रीन बी च्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना टिकुजीनीवाडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. मुल्लाबागकडुन टिकुजीनीवाडी सर्कलच्या दिशेने येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असुन या वाहिनीवरून वाहने इच्छित स्थळी जातील.

वाहने उभी करण्यास मनाई

मॉडेला चेक नाका, २२ नंबर सर्कल, साठेनगर चौक, इंदिरा नगर नाका, कामगार नगर नाका, आर. जे. ठाकुर कॉलेज कटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तसेच कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगर नाका ते शास्त्रीनगर नाकाकडे जाणारा रस्ता, बिरसामुंडा चौक ते देवदयानगर चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजुरस वाहने उभी करण्यास मनाई (No Parking) करण्यात येत आहे. आर जे. ठाकुर कॉलेज कट ते महात्मा फुले नगर ते आईमाता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तसेच नितिन जंक्शन सेवा रस्ता ते कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर स्पर्धा संपेपर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे.