‘ठाणेकरांचा खरेदी उत्सव’ अशी ओळख असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली शहरांतील विविध दुकानांमध्ये नुकतीच सुरुवात झाली असून ग्राहकांचा या फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या दिवसापासून या उपक्रमात सहभागी दुकानांमध्ये दाखल झालेले ग्राहक २५० रुपयांच्या खरेदीनंतर ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’ची कूपन्स भरू लागले आहेत. महोत्सवातून ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. २३ दिवसांच्या या महोत्सवात खरेदी करणाऱ्यांना दररोज भरघोस बक्षिसांची लयलूट करता येणार आहे.
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे नाणे, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स, रेमंड, शगुन, कलानिधी आणि ओंकार किचन्स यांच्याकडून आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत, तर प्रत्येक आठवडय़ाच्या पारितोषिकांमध्ये एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, पैठणी साडी ही पारितोषिके मिळतील. त्याचप्रमाणे महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे एका भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या भाग्यवंत ग्राहकाला केसरी टुर्सकडून दोन व्यक्तींसाठी सहल यांच्यासारखी बक्षिसे बम्पर पारितोषिके म्हणून दिली जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या वीकएण्डनिमित्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महोत्सवाने मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. वीकएण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून युनियन बँक आणि प्रशांत कॉर्नर असोसिएट पार्टनर आहेत.
त्याचप्रमाणे प्लॅटिनम पार्टनर झेना डिझाईन, हस्तकला, वागडस्, मायक्रो फाइन, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर, वॉर्डरोब पार्टनर दी रेमण्ड शॉप, गिफ्ट पार्टनर कलानिधी, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स आणि ओंकार किचन वल्र्ड, नॉलेज पार्टनर रिलायबल अॅकॅडमी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स द ग्रिल हाऊस हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसे सहभागी व्हाल?
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल. २५० रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेली कूपन्स ग्राहय़ धरली जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कूपन्स संकलित करून ‘लोकसत्ता ठाणे ’ कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल. त्यांची नावे ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध केली जातील. महोत्सवातील सर्व योजनांना अटी-शर्ती लागू आहेत. या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी- ९८२१४७५९१९ यांच्याशी संपर्क साधावा.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane shopping festival get spontaneous response from customers
First published on: 26-01-2016 at 09:40 IST