लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खड्ड्यांच्या प्रभाग स्तरावर तक्रारी करुनही त्याची सोडवणूक होत नाही. म्हणून पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रार निवारणासाठी प्रशासनाने १८००२३३००४५ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केला आहे.

नागरिकांनी आपल्या विभागातील खड्ड्यांविषयक तक्रारी टोल फ्री क्रमांकावर केल्यास तेथे त्या तक्रारीची नोंद करुन घेतली जाईल. तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्याला तक्रारीचे ठिकाण देऊन संबंधित खड्डे बुजविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे, असे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबई : मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडचा मार्ग मोकळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका हद्दीतील खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिक, संघटना आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करू लागले आहेत. खड्ड्यांच्या विषयावरुन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासना विरुध्द एक जनहित याचिका एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे. खड्ड्यांमुळे पालिका हद्दीत दोन दिवसापूर्वी एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता. या घटनेवरुन ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.