बँक दरोड्याच्या गुन्हेगारीवर आधारित वेब सीरिज व चित्रपट बघून डोंबिवलीतील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाला बँकेची तिजोरी लुटण्याचा मोह झाला. ११ वर्ष एकाच बँकेत काम करत असल्याने बँकेच्या तिजोरीसह सर्व हालचालींची बारकाईने माहिती असलेल्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापनाने जुलैमध्ये बँकेच्या तिजोरीतील सुमारे ३४ कोटी रक्कम गुपचूप लुटून नेण्याचा प्रयत्न केला. या रकमेतील १२ कोटीची रक्कम व्यवस्थापकाने मोठ्या चलाखीने सहकार्यांच्या मदतीने लुटून नेली. बँकेच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर तिजोरी संरक्षक व्यवस्थापक फरार झाला. अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर मानपाडा पोलिसांनी तिजोरी व्यवस्थापकाला बुधवारी पुण्यातून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अंबरनाथ स्थानकातील पादचारी पुलाची दुरूस्ती; पादचारी पुलाअभावी प्रवाशांचा रूळ ओलांडून प्रवास

अल्ताफ शेख (४३) असे तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाचे नाव आहे. त्याचे या प्रकरणातील सहकारी आरोपी अबरार कुरेशी (३३), अहमद खान (३३), अनुज गिरी (३०) यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या चोरीचा म्होरक्या व्यवस्थापक शेख होता. चार महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अल्ताफ शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या खर्चावर पाळत ठेवली होती.
पोलिसांनी सांगितले, अल्ताफला दरोडे, चोऱ्या, बँक लुटीच्या घटनांवर आधारित चित्रपट, वेब सिरिज पाहण्याची खूप हौस होती. या सततच्या पाहण्यातून त्याने आपण कार्यरत असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या डोंबिवली एमआयडीसीतील शाखेतून बँकेला कोणताही संशय येणार नाही अशा पध्दतीने बँकेच्या तिजोरीतून रक्कम लुटीची योजना आखण्यास सुरुवात केली.

हेही वाचा- ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेनं मृत जोडीदाराची १९ कोटींची संपत्ती हडपली, लग्न झालं नव्हतं तरीही…

११ वर्ष अल्पाफ बँकेच्या एमआयडीसीत शाखेत कार्यरत होता. बँकेचे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही यांच्या हालचाली, येणेजाणे त्याला माहिती होते. बँक तिजोरी लुटण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्ताफने त्यानंतर लुटीची रक्कम कोठे ठेवायची. तिजोरी कशी फोडायची. ती रक्कम बँकेतून सीसीटीव्हीला चकवा देऊन कशी बाहेर काढायची अशी योजना वेब सिरिजचा अभ्यास करुन तयार केली. बँकेचा सीसटीव्हीची दिशा बदलून, धोक्याचा इशारा देणारा भोंगा निष्क्रिय करुन एसीच्या एका बाजुला मोठे छिद्र पाडून त्यामधून तिजोरीतील ३४ कोटी रक्कम बाहेर टाकण्याचा निर्णय घेतला. एवढी चोरी करुनही मी या प्रकरणात कोठेही नाही असे दाखविण्याचा अल्ताफचा प्रयत्न होता. दीड महिने बँकेची अंतर्गत पाहणी होणार नसल्याची खात्री पटल्यावर अल्ताफने हळूहळू रक्कम लुटीचा डाव रचला. परंतु बँक अधिकाऱ्यांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ वरिष्ठ आणि बँक पाहणी पथकाला बोलविण्याचा निर्णय बँकेने घेतला. आता आपण या प्रकरणात अडकले जाऊ या भीतीने तत्पूर्वीच तिजोरीतील ३४ कोटीची रक्कम लुटीचा डाव रचला. त्याने एसीच्या छिद्र पाडलेल्या भागातून ३४ कोटीची रक्कम भरुन ठेवली होती. ती रक्कम त्याने बँक इमारतीच्या पाठीमागील बाजूला लोटली. त्यावर ताडपत्री टाकली. या रकमेतील १२ कोटीपैकी अल्ताफने आपल्या मित्रांसह लुटून पळून गेला.

हेही वाचा- तरुणीचा पाठलाग करत असल्याचा होता आरोप; ५० वर्षीय व्यक्तीचा पोलीस ठाण्यातच झाला मृत्यू

लुटीपूर्वी त्याने लुटीचा आराखडा तयार करण्यासाठी तळोजा येथे एक सदनिका बहिणीच्या नावाने खरेदी केली होती. तेथे वेब सिरिज पाहून तो आराखडा तयार करायचा. स्वता जवळील लुटलेली तीन कोटीची रक्कम ठेवण्यासाठी ऐरोलीत एक निर्जन ठिकाण पाहिले. ही पिशवी गर्दुल्ल्यांच्या हाताला लागली. ती त्यांनी मौजमजेवर उधळली. बँकेने तक्रार केल्याने पोलीस तपास सुरू झाला होता. व्यवस्थापक शेख यानेच हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी राज्याच्या विविध भागात जाऊन त्याचा शोध घेतला. तो पोलिसांना चकवा देत होता.
अल्ताफचे कुटुंब मोठे आहे. तो मुंब्रा येथे आई, वडिल, पत्नी, मुलीसह राहत होता. वाढता घर खर्च भागविण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली. या चोरी प्रकरणात अल्ताफच्या पत्नीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले, असे पोलीस तपासात उघड झाले.

हेही वाचा- डोंबिवलीतील ३९ भूमाफियांच्या बांधकामांची साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी

तिजोरीतील रक्कम लुटीपूर्वी तिजोरीचा बारकाईने अभ्यास करुन अल्ताफने ही लूट केली. त्याच्या लॅपटाॅपमधून हार्डडिस्क, बँकेच्या आतील दृश्यीकरण ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The managers attempt to rob 34 crores from the bank by watching the web series in dombivli thane news dpj
First published on: 07-10-2022 at 12:29 IST