भगवान मंडलिक

डोंबिवलीतील भूमाफियांवर गुन्हे दाखल असलेल्या ६५ बेकायदा इमारतींमधील ३८ इमारतीमधील सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार, दस्त नोंदणीकरण करू नये. हा विक्री व्यवहार करण्यासाठी भूमाफिया सदनिका खरेदीदारांना कल्याण, डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी घेऊन आले तर तात्काळ त्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला द्यावी, असे पत्र ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाचे प्रमुख साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी कोकण विभागाचे ठाणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक यांना पाठविल्याने माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

हेही वाचा >>>डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकचे कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

बेकायदा इमारत उभारणीत अगोदरच तीन ते चार कोटीची गुंतवणूक अडकून पडली आहे. त्यात सदनिका व्यवहार तपास पथकाने रोखून धरल्याने माफियांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास तपास पथकाने सुरू केले असल्याचे समजते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, त्या आधारे ‘रेरा’चा नोंदणी क्रमांक मिळवून डोंबिवली, २७ गाव हद्दीत माफियांनी एक हजाराहून अधिक बेकायदा इमारती बांधल्या आहेत. यामधील ६५ बेकायदा इमारती याचिकाकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या तत्परतेमुळे उघडकीला आल्या आहेत. या प्रकरणाची ठाणे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून चौकशी सुरू आहे.बांधकाम प्रकरणात कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. शासनाचा कोट्यवधीचा महसूल माफियांनी बुडविला आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे. दोन तगड्या यंत्रणा बेकायदा इमारत प्रकरणाची चौकशी करत असल्याने माफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा >>>ठाणे शहरात आठ ठिकाणी ‘मियावाकी जंगल’; शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेचा उपक्रम

६५ मधील प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र छाननी करुन तपास पथके कारवाई निश्चित करत आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाने ६५ पैकी ५२ गृहप्रकल्पांची रेरा नोंदणी रद्द केली आहे. आपण यंत्रणांना गुंडाळून ठेऊ हे माफियांचे मनसुबे तपास पथकांनी उधळून लावले आहेत. त्यात तक्रारदार संदीप पाटील आवश्यक माहिती या यंत्रणांना देत आहेत. येत्या विधीमंडळ अधिवेशनात या विषयावर काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण अतिशय गांभीर्याने शासनाकडून हाताळले जात आहे. एका विकासाभिमुख लोकप्रतिनिधीचा आधार घेऊन भूमाफिया सध्या संचार करत आहेत. आक्रमक यंत्रणांपुढे या लोकप्रतिनिधीचे काही चालत नसल्याचे कळते.

तपास पथकाचे पत्र
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या वापरल्या म्हणून दोषींवर कारवाई करावी म्हणून दोन वर्ष तक्रारदार पाटील पालिकेत फेऱ्या मारत होते. पालिका अधिकारी या बेकायदा बाधकामांना पाठीशी घालत होते. पालिकेकडून कारवाई होत नसल्याने तक्रारदार संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू होताच माफियांनी बेकायदा इमारतींमध्ये बेघर, बिगारी कामगारांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यास सांगून इमारतींमध्ये रहिवासी राहतात असा देखावा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी या इमारतींमधील सदनिका विक्री करण्याची घाई चालविली आहे. ही गुप्त माहिती तपास पथकाला समजली. या प्रकरणात घर खरेदीत सामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तपास प्रमुख सरदार पाटील यांनी ३८ बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे खरेदी विक्री व्यवहार, दस्त नोंदणी होणार नाही याची दक्षता घेण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षकांना सूचित केले आहे.नोंदणी विभागातील एका वरिष्ठाने अशाप्रकारचे पत्र आले आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे : भिवंडीत गोळीबारात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात

विक्री व्यवहार ठप्प प्रकल्प
अमरदीप खांडेकर-संतोष कुडाळकर, आयरे. बाॅम्बे गोग्रास भिक्षा सोसायटी-संतोष कुडाळकर, पाथर्ली. श्री समर्थ डेव्हलपर्स-मयुर देशमुख, कांचनगाव. वाघेश्वरी डेव्हलपर्स-आशु मुंगेश-एस. डी. ओक, गावदेवी. सरोजिनी मिश्रा-आदित्य इन्फ्रा प्रफुल गोरे-कोपर. कृष्ण इन्फ्रा-राममुरत गुप्ता, एस. डी. ओक, ठाकुर्ली. मच्छिंद्रनाथ एंटरप्रायझेस-सिता पाटील-आयरे. मधुकर म्हात्रे-गोल्डन डायन्मेशन, शिवाजीनगर. गुलमोहर डेव्हलर्पस-शिरीष चौधरी-संतोष कुडाळकर,कांचनगाव. पिंपळादेवी कन्स्ट्रक्शन-आनंदी म्हात्रे-गोल्डन डायमेंशन,ठाकुर्ली. सनशाईन डेव्हलपर्स-रविराज पाटील-सागर भोईर, कांचनगाव. समर्थ कृपा डेव्हलपर्स, एक्सपर्ट होम्स कन्स्ट्रक्शन-युवराज कांबळे-दत्तात्रय पाटील, आयरे. डी. व्ही. इन्फ्रा-दिनेश सुतार, शिवाजीनगर. ओम साई डेव्हलपर्स-मयुर वारेकर-गावदेवी, साई डेव्हलपर्स-गणेश भोईर-चंद्रशेखर भोसले, आयरे. एकविरा एन्टरप्रायझेस-सुनील मढवी-दिनकर म्हात्रे, आयरे. समर्थ डेव्हलपर्स-सखाराम केणे-्अक्षय सोलकर,आयरे. गावदेवी कन्स्ट्रक्शन-मनोहर पाटकर, जयंता मोरे, शिवाजीनगर. स्वामी समर्थ एन्टरप्रायझेस-अनिल केणे, आयरे. गौतम एन्टरप्रायझेस-गौतम माळी,आजदे. साईकृपा डेव्हलपर्स-आनंदा म्हात्रे,ठाकुर्ली, तुळजाभवानी डेव्हलपर्स-सोपान पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीनगर. बाळाराम भोईर-गोविंद माल्या,ठाकुर्ली. आदित्य इन्फ्रा-देवचंद कांबळे-नीलेश गुरव, आयरे. स्पर्सिका डेव्हलपर्स-अजिंक्य नारकर, शिवाजीनगर. भवानी डेव्हलपर्स-सुनील यादव-सिध्दार्थ म्हात्रे, कोपर. रुद्र इन्फ्रा-रजत राजन-आयरे. सिध्दीविनायक डेव्हलपर्स-राजेश पाटील-जी. एन. गंधे, नवागाव. श्री एन्टरप्रायझेस-भास्कर चौधरी-उदय पाटील,कांचनगाव. साईज्योत एन्टरप्रायझेस-राजाराम तरे, नवागाव. गणेश डेव्हलपर्स-अविनाश म्हात्रे, धर्मेंद्रसिंग, कोपर. आरएमजी इन्फ्रा-राजेश राम-प्रदीप ठाकूर,नवागाव. आशन डेव्हलपर्स-लक्ष्मण केणे-प्रशांत माळी,आयरे. गोरक्षनाथ कन्स्ट्रक्शन-किरण घुले, अनंता पाटील, आयरे. अनुसया चौधरी-गोल्डन डायमेंन्शन, कांचनगाव. डिलक्स होम-सचीन तळेकर, प्रमोद कांबळे, कांचनगाव.

” दाखल सर्व प्रकरणांची छाननी करुन त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. खरेदी विक्री व्यवहार थांबविणे हा त्याचा भाग आहे. इतर प्रकरणांचे व्यवहार अशाप्रकारे थांबविले जातील.”-सरदार पाटील,तपास पथक प्रमुख