Premium

ठाणे: चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले

वर्तक नगर येथील उपवन भागात दुचाकी वर आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोने खेचून नेल्याचा प्रकार उघडकीस आहे.

crime
चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

ठाणे : वर्तक नगर येथील उपवन भागात दुचाकी वर आलेल्या दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोने खेचून नेल्याचा प्रकार उघडकीस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार महिला या शनिवारी रात्री उपवन भागात पतीसह दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दोन चोरटे दुचाकीवर आले. त्यांनी तक्रारदार महिला आणि त्याच्या पतीला अडविले तसेच महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने खेचले. त्यानंतर दोघेही चोरटे दुचाकीवरून निघून गेले याप्रकरणी महिलेने वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 11:37 IST
Next Story
ठाण्यात समूह विकास मार्गी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पास प्रारंभ