ठाणे: नितीन कंपनी भागात रविवारी दोन गटामध्ये वाद सुरू होते. येथील जमाव हटकण्यासाठी गेलेल्या तरूणालाच तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागात मारहाण झालेला तरूण राहातो. त्यांचा बांधकामाच्या ठिकाणी मजुर पुरविण्याचा व्यवसाय आहे. रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तो नितीन कंपनी येथील सेवा रस्त्याजवळ मित्राला भेटण्यासाठी त्याच्या कारने गेला होता. त्यावेळी तिथे दोन गटामध्ये वाद सुरू होता. तसेच त्याठिकाणी मोठी गर्दी जमली होती. तरूण तात्काळ कारमधून खाली उतरला. तसेच ‘गर्दी करू नका’ असे जमावाला समजावत होता. त्याचा राग आल्याने येथील तीन ते चार जणांनी त्यांना लोखंडी वस्तूने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला. तसेच एकाने त्यांच्या पोटाजवळ दगडाने मारहाण केली.

हेही वाचा… मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चारजण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांचा मित्र त्याठिकाणी आला असता, मारहाण करणारे तेथून पळून गेले. तरूणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.