ठाणे: सिद्धेश्वर जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून यामुळे गुरुवार सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सिध्देश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीवरील ५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी हे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामध्ये सिध्देश्वर जलकुंभ, इटरनिटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समता नगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, विवियाना मॉल व आकृती जलकुंभ भागांचा सामावेश आहे.

हेही वाचा… कळवा रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुविधा नाहीच; डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांअभावी सुविधा पुरविण्यात अडचणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.