लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: तु आम्हाला १० हजार रुपये तात्काळ गुगल पे करुन पाठव, अन्यथा आम्ही तुमची समाज माध्यमांवर बदनामी करु, अशा धमक्या डोंबिवलीतील गणेशनगर भागात राहत असलेल्या एका दिव्यांगाला भामट्यांकडून देण्यात येत आहेत. भामट्यांच्या त्रासाला कंटाळून दिव्यांगाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

किरण चौधरी हे डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहतात. ते दिव्यांग आहेत. गुरुवारी सकाळी ते बोरिवली येथे लोकलने चालले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप एक लघुसंदेश आला. त्याला किरण यांनी आपण कोण, अशी विचारणा केली. त्यावेळी एक मोबाईल क्रमांक पाठवितो, त्यावर तु ताबडतोब १० हजार रुपये पाठव, नाहीतर तुझी समाज माध्यमांवर बदनामी करु, अशी धमकी भामट्याने दिली.

हेही वाचा… डोंबिवलीत पलावा येथे निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग

किरण यांनी तो मोबाईल क्रमांक कायमचा बंद करुन टाकला. तात्काळ दुसऱ्या मोबाईलवरुन किरण यांना त्यांची छबी असलेले संदेश येऊ लागले. भामटे त्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेश, संपर्क करुन त्रास देऊ लागले. या सगळ्या प्रकाराने किरण अस्वस्थ झाले. त्यांनी बोरिवली येथे उतरुन कस्तुरबा पोलीस ठाण्यात जाऊन तेथील वरिष्ठांना सुरू असलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा… ठाणे: रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात बदल; कार्यालयीन अधीक्षक आणि लिपीकांची नेमणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस ठाण्यात असताना भामट्याने किरण यांना संपर्क केला. मी पोलीस ठाण्यात आहे असे त्यांना सांगितले त्यावेळी माझे कोणी काही करु शकत नाही, तु पहिले मला १० हजार पाठव, अशी आग्रही मागणी भामट्याने सुरूच ठेवली. चार ते पाच मोबाईलवरुन किरण यांना त्रास देण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळून किरण यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.