डोंबिवली– डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिर शाळे समोर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून फरार असलेल्या भुरट्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या दोन घटना ताज्या असतानाच बुधवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील मंजुनाथ शाळे जवळ तीन भुऱट्या चोरांनी दोन वृध्द महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळ काढला.

घरडा सर्कलकडून मंजुनाथ शाळे समोरुन हे तीन भुरटे डोंबिवली रेल्वे स्थानक भागात चालले होते. एका महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज भामट्यांनी लुटून नेला आहे.

हेही वाचा >>> कल्याण, बदलापूर, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणारे चोरटे अटकेत ; आठ लाखाचा ऐवज जप्त

शाळेत मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या महिला मुलांना शाळेत सोडल्यानंतर घरी जाण्यासाठी रस्त्यावर रिक्षेची वाट उभ्या असतात. अशा महिलांना हेरुन त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करुन, सम्मोहित करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याचे प्रकार डोंबिवलीत गेल्या आठवड्यापासून वाढले आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंजुनाथ शाळेजवळ लूट झालेल्या महिलेचे नाव पद्मा सूर्यकांत सुर्वे (६१, रा. शिवशक्ती इमारत, पोटेश्वर व्हिला इमारतीच्या समोर, डोंबिवली पूर्व) आणि अन्य एका महिलेचे नाव मथुराबाई आहे. त्या गृहसेविका आहेत. पोलिसांनी सांगितले, बुधवारी सकाळी अकरा वाजता पद्मा आपल्या कामावर जात असताना त्यांना घरडा सर्कलकडून येत असलेल्या तीन तरुणांनी अडविले. एका श्रीमंत माणसाला चार वर्षांनी मुलगा झाला आहे. तो तिथे गरीब लोकांना वस्तू वाटत आहे. असे सांगुन तीन जणांनी महिलेला बोलण्यात गुंतवणूक संम्मोहित करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. त्याचवेळी भामट्यांनी पद्मा यांच्या सोबत असलेल्या असलेल्या मथुराबाई यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांचीही फसवणूक केली आहे.

पद्मा यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावर दोन महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनीच हा प्रकार केला असण्याच संशय पोलिसांना आहे.  हे भामटे शहरातील झोपड्या, बेकायदा चाळींमध्ये राहून हे प्रकार करत आहेत.