पावसाळा आला की पर्यटकांचा ओघ धबधब्यांकडे वाढतो. धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे आणि वर्षांसहल साजरी करायची याकडे पर्यटकांचा ओघ असतो. वसई तालुक्यातील तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधबे तर पर्यटकांचे खास आकर्षण! गेल्या आठवडय़ापासून वसईमध्ये मनसोक्त पाऊस पडत असल्याने पर्यटकांची या दोन्ही धबधब्यांवर गर्दी झाली आहे. धबधब्यांचा ‘चिंब’ आनंद घ्यायचा आणि येथील जंगलात सफर करायची, याचा अनुभव सध्या पर्यटक घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय सहलीसाठी तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हा उत्तम पर्याय आहे. वर्षांसहलीबरोबरच जंगल सफरीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक, दुचाकीस्वार, छायाचित्रकार, प्रक्षी-प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी अवतरत आहेत. मुंबई महामार्गापासून आणि वसई रोड रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला असते. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे उपलब्ध नव्हते. परंतु जूनच्या शेवटच्या आठवडय़ात उशिराने दाखल झालेल्या पावसाने मात्र पर्यटकांची ही हौस पूर्ण केली. रविवारपासून या भागात मोठी गर्दी होत आहे. येत्या काही महिन्यांत लाखो पर्यटक येथे दाखल होणार आहेत. सध्यातरी धबधब्यांचे आकर्षण असलेल्या तरुणाईची पावले येथील नदी, नाले ओलांडून सफारीचा आनंद घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tungareshwar chinchoti waterfall
First published on: 01-07-2016 at 03:01 IST