scorecardresearch

लोकलमधून पडून दोन जणांचा मृत्यू ; कोपर-दिवा स्थानकांमधील घटना

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या दोन्ही अपघातांची पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.

death
(प्रातिनिधिक छायाचित्र)

डोंबिवली– लोकलमधून पडून दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. मृतामध्ये एका तरुणाचा आणि एक वृध्दाचा समावेश आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या दोन्ही अपघातांची पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे मार्गालागत एक वृध्द पडला असल्याची माहिती मिळाली. त्याच्या जवळ ओळखीसाठी कोणतेही कागदपत्र नाहीत. वृद्धाची ओळख पटविण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे. कोणत्या पोलीस ठाण्यात वृध्द बेपत्ता आहे अशी नोंद आहे का याचा तपास घेत आहेत. दुसऱ्या घटनेत कोपर ते दिवा रेल्वे स्थानकां दरम्यान कल्याण दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गात एक तरुण लोकलमधून पडून जागीच ठार झाला. या तरुणाचा उजव्या हातावर तीन चांदण्या, सूर्याचे चिन्ह गोंदले आहे. या तरुणा्च्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two die after falling from local train at kopar diva stations zws