उल्हासनगर : महापालिकेची बंद पडलेली परिवहन सेवा नव्याने सुरू होणार आहे. शहरात आणि आसपासच्या शहरांमध्ये सेवा देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने बस निर्मिती कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. यात २० वीजेवरील बसचा समावेश असून कंत्राटदार कंपनीला प्रतिकिलोमीटर दराने पैसे दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे लवकरच उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा सुरू होण्याची आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- साहाय्यक आयुक्त बदलताच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या शुद्ध हवा योजनेअंतर्गत नुकतीच उल्हासनगर शहराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात प्रदुषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आणि शहरातील बंद पडलेली परिवहन सेवा पुन्हा चालू करण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेने नुकतीच एक निविदा जाहीर केली. त्याअन्वये उल्हासनगर शहर आणि आसपासच्या शहरात पालिकेच्या माध्यमातून परिवहन सेवा देण्यासाठी बस निर्मिती कंपन्यांना निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात सुरूवातीला २० बस गाड्यांचा समावेश पालिकेच्या परिवहन सेवेत केला जाणार आहे. या सर्व बस वीजेवरील असणार आहेत. कंत्राटदार कंपनीने प्रति किलोमीटर प्रवास दर सादर करायचा आहे. त्यानुसार पालिका प्रशासन कंत्राटदार कंपनीला काम देणार आहे. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर तसेच उपायुक्त अशोक नाईकवडे यांनी यासाठी वेगाने हालचाली केल्या. अखेर ही निविदा जाहीर झाली असून येत्या चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन शहरात परिवहन सेवा सुरू होण्याची आशा पालिका प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा- कल्याण: देसई खाडी पुलावर तुळई ठेवण्याच्या कामासाठी शिळफाटा रस्ता रात्रीच्या वेळेत आठ दिवस बंद

या’ शहरांना मिळणार सेवा

उल्हासनगर शहरातील अतंर्गत वाहतुकीसह शेजारच्या कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात उल्हासनगर महापालिका परिवहन सेवा देणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होईल. आसपासच्या महापालिकांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या बससेवेचा दर अभ्यासून त्यानुसार तिकिटाचा दर जाहीर केला जाईल, अशी माहिती वाहन विभागप्रमुख विनोद केणे यांनी दिली आहे.

हेही वाचा- कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे चालले महिनाभर प्रशिक्षणाला

सर्व बस वीजेवरील

शुद्ध हवा योजनेत केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ५० टक्के अनुदानातून परिवहन सेवा सुरू होईल. यात सर्व बस वीजेवरील असणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासन बस डेपोची जागा देणार आहे. तर कंत्राटदार कंपनीला या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारायचे आहेत. १० मिडी तर १० मोठ्या अशा २० बस सुरूवातीला असणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar municipality invited tenders for 20 electric buses thane dpj
First published on: 14-12-2022 at 17:34 IST