केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची तत्त्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टिका

ठाणे : करोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: करोना प्रतिबंधक लसीकरण आणि करोनाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवत होते. केंद्राकडून भरपूर मदत मिळत असतानाही राज्यात अनेक भागात अनियमितता होती. अशी टिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली.

हेही वाचा >>> कल्याण मधील गांधारी पुलाचे चौपदरीकरण?; कल्याण ते पडघा रस्ते कामांसाठी ‘एमएमआरडीए’कडून ४०० कोटीचा निधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद स्विकारले आहे. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी सोमवारी ठाण्यातील भाजपच्या खोपट येथील मध्यवर्ती कार्यालयात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. करोनामध्ये वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील प्रत्येक मुख्यमंत्ऱ्यांशी २० पेक्षा जास्त वेळा संवाद साधला होता. त्यांचे देशातील सर्वच राज्यांवर लक्ष होते. करोना प्रतिबंधक लशींच्या पुरवठ्याबद्दल, अडचणींबद्दल मोदी स्वत: माहिती घेत होते. त्यामुळे देशातील सर्वच मुख्यमंत्ऱ्यांनी त्यांचे आभार मानले होते. केंद्राकडून राज्याला भरपूर मदत मिळत होती. परंतु त्यावेळी राज्यात काही ठिकाणी याबाबत अनियमितता झाली होती, असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केला आहे. यावेळी जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद मिळणे हा भारतीयांचा गौरव असल्याचेही त्या म्हणाल्या.