स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीमधून गळती होत असल्याने बुधवारी सकाळी ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत भिवंडी शहरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण कंपनीकडून मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, या कामामुळे ठाणे शहरातील देखील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. २४ तासांच्या बंदमुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठ्याचे विभागवार १२ तासांचे नियोजन करणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

water problems in Mira Bhayander area
मिरा-भाईंदरमध्ये भीषण पाणीटंचाई; दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
pimpri chinchwad, citizen, water scarcity, Pavana Dam, Water Storage, Decrease, Summer Heat Rises, Evaporation, marathi news,
पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

मानकोली भागातील मुख्य जलवाहीनीवर पाणी गळती होत असून, ही गळती बंद करण्याचे काम स्टेम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.