कल्याण – बीएमएडब्ल्यूच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या शुभम मितालिया या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. या प्रकरणात या वाहनाचे मालक आणि वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलावरही पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.

एका विकासकाच्या मुलाने पुण्यात दोन अभियंत्यांना मोटारीने चिरडल्याची घटना ताजी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात संताप व्यक्त केला जात असताना, कल्याणमध्ये एका धनाढ्याचा अल्पवयीन मुलगा आपली बीएमडब्ल्यू कार घेऊन कल्याणमधील शिवाजी चौक भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर चालविता होता. या तरुणाने मोटार अल्पवयीन मुलाच्या ताब्यात देऊन स्वता मोटारीच्या बोनेटवर बसून पादचाऱ्यांना हास्य देत स्टंटबाजी केली. हा सगळा प्रकार पाहून नागरिकांनी आणि इतर वाहन चालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. विशेष म्हणजे या मोटारीच्या पुढच्या बाजूला वाहन क्रमांक नव्हता. हे वाहन चालवित असताना काही अपघात घडला असता तर त्याची जबाबदारी कुणाची होती, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला

या स्टंटबाजीची एक दृश्यचित्रफीत प्रसारित होताच, पोलिसांनी या मोटार चालकाचा आणि त्या भागाचा शोध सुरू केला. कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच, पोलिसांनी बीएमडब्ल्यूच्या मोटार वाहन क्रमांकावरून या वाहनाचा मालक, त्याचा पत्ता शोधला. स्टंटबाजी करणाऱ्या शुभम मितालिया याला अटक केली.

हेही वाचा – डोंबिवलीतील मराठी उद्योजक धास्तावले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टंटबाजी करणारा तरुण शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. बीएमडब्यू ही अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांनी घेऊन दिली आहे. अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्व भागात राहतो. वडिलांची नजर चुकवून अल्पवयीन मुलगा बाजारपेठ भागात आला. यावेळी शुभम मितालिया त्याच्या संपर्कात आला. शुभमला मोटारीच्या बोनेटवर बसून प्रवास करण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे त्याने बोनेटवर बसून प्रवास केला, असे पोलीस तपासात उघड झाले. बाजारपेठ पोलिसांनी मोटार मालकासह दोन जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.