कोराईगडावर स्वच्छता मोहीम
‘यंग ट्रेकर्स’ संस्थेच्या सदस्यांनी लोणावळय़ाजवळील कोराईगडावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सदस्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दारुच्या बाटल्या, गुटखा, सिगारेटची पाकिटे आदी ३ पोती कचरा गोळा केला. गडावरील कोराई माता, शंकराच्या मंदिराची साफसफाई करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सुनील भोकरे, यश सुळे, रणजित भंडारी, विजय मांडवकर आदी सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला. संस्थेतर्फे १७ व १८ मे रोजी रायरेश्वर, केंजळगड येथे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेतही या गडांवर स्वच्छता केली जाणार आहे. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी सुनील भोकरे (९६७६२९४०३१) यांच्याशी संपर्क साधावा.

सिंधुदुर्ग, तारकर्ली सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २३ ते २५ मे दरम्यान सिंधुदुर्ग, तारकर्ली, अंबोली, वेंगुर्ला अशा सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
साहस शिबिर
‘पिक अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या १८ मे रोजी एक दिवसीय साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९२१२७५७६ वर संपर्क साधावा.