ताडोबा हेमलकसा भ्रमंती
ताडोबा हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून जास्त पक्ष्यांच्या प्रजातींचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘जीविधा’तर्फे आयोजन केले आहे. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत जाणाऱ्या या सहलीमध्ये हेमलकसा आणि आनंदवन या प्रकल्पांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी वृंदा पंडित (९४२१८३२९१२) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबा घाटाची वर्षां सहल
सह्याद्रीच्या कुशीतील, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा हे एक निसर्गाचे वरदान लाभलेले असे जंगल! पाऊस सुरू झाला, की मलकापूरजवळील या निसर्गाला जणू जाग येते. जोरदार पाऊस, नाचणारे धबधबे आणि सोबतीला हिरवाईचा नजारा यामध्ये आंबा घाट हरवून जातो. नाना तऱ्हेचे पशूपक्षी, उभयचर प्राणी आणि वैविध्याने भारलेल्या वनस्पती यांनी हे आंबा घाटाचे जंगल निव्वळ भरून गेलेले आहे. अशा या घाटात, तिथल्या जंगलवाटांवर पदभ्रमण आणि वर्षां सहलीचे ‘निसर्ग टूर्स’तर्फे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १७ सप्टेंबर दरम्यानच्या या मोहिमेमध्ये आंबा जंगलाशिवाय खिद्रापूर येथील कोरीव कोपेश्वर मंदिर आणि नृसिंहवाडीतील दत्तमंदिरास भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या २९, ३० आणि ३१ ऑगस्ट दरम्यान कोयनानगर, ओझर्डे, सवतसडा, निवळी, नांगरतास, अंबोली, नापणे, मार्लेश्वर आदी धबधब्यांच्या परिसरात दोन वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
गोकाक वर्षांसहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २३ ऑगस्ट रोजी गोकाक धबधबा, कन्हेरी मठ परिसरात वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड मोहीम
‘भोसला अॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या १७ ऑगस्ट रोजी हरिश्चंद्रगड मोहिमचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष जगताप (९१८१५४७२८०) यांच्याशी संपर्क साधावा.