17 January 2021

News Flash

बापाचं ह्रदय शेवटी ते…अधिकारी मुलीच्या खांद्यावरील स्टार कौतुकाने पाहणाऱ्या पित्याचा फोटो व्हायरल

हा फोटो मणिपूरमधील असून रत्ताना एनगासेप्पम असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे

आपल्या मुलांनी खूप यश मिळवावं असं प्रत्येक पित्याला वाटत असतं. जेव्हा आपलं मूल अशी कामगिरी करतं तेव्हा त्याचं कौतुक वाटणंही स्वाभाविकच आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक पिता आपल्या पोलीस अधिकारी मुलीच्या खांद्यावरील स्टार कौतुकाने पाहत असल्याचं दिसत आहे. हा फोटो मणिपूरमधील असून रत्ताना एनगासेप्पम असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

फोटोत रत्ताना एनगासेप्पम आपले वडील कौतुकाने स्टार पाहत असल्याचं पाहून हसताना दिसत आहेत. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून रत्ताना एनगासेप्पम यांच्या वडिलांच्या डोळ्यात दिसणारं ते कुतुहूल, कौतुक लोकांना प्रचंड भावलं आहे. दरम्यान महिला सशक्तीकरणाचं हे योग्य उदाहरण असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

हा फोटो सध्याचा नसून जुना आहे. सध्या रत्ताना एनगासेप्पम मणिपूर पोलिसांत अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर आहेत. ट्विटरला एका युजरने हा फोटो शेअर केला होता. या फोटोला १५ हजाराहून अधिक जणांनी लाइक केला असून दोन हजाराहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:58 pm

Web Title: a father checks the stars on cop daughters uniform is going viral sgy 87
Next Stories
1 मुलाच्या ‘X Æ A-12’ या नावाचा उल्लेख करायचा तरी कसा?, इलॉन मस्क म्हणाले…
2 त्याच्या शरीरात अढळल्या तीन किडन्या; डॉक्टरही चक्रावले
3 Samsung ने 17 मेपर्यंत वाढवली ‘ती’ ऑफर; एसी, फ्रिज-टीव्हीवर ‘बंपर’ कॅशबॅक
Just Now!
X