भारतीय नागरिकत्व स्वीकारणारा गायक अदनान सामी ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतो. नुकतेच त्याने एक मजेशीर ट्विट केले असून त्याचे हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. अदनानने एका हत्तीचा फोटो शेअर केला. त्या हत्तीने पँट-शर्ट घातलेलं फोटोमध्ये दिसतंय. पण या फोटोसोबत अदनान सामीने जे कॅप्शन वापरले त्यामुळे त्याचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
My old clothes! pic.twitter.com/wLx1GGeMP2
— Adnan Sami (@AdnanSamiLive) December 31, 2019
३१ डिसेंबर २०१९ रोजी अदनानने पँट-शर्ट घातलेल्या एका हत्तीचा फोटो शेअर केला, त्यासोबत त्याने ‘माझे जुने कपडे’ असे ट्विट केले. लठ्ठपणाचा न्यूनगंड न बाळगता स्वतःचीच खिल्ली उडवणाऱ्या अदनान सामीच्या स्वभावाचे नेटकरी तोंडभरुन कौतुक करत आहेत, तर अनेकजण त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत आहेत. ‘मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे…’गाण्यामुळे लोकप्रिय झालेला गायक अदनान सामी कधीकाळी अत्यंत लठ्ठ होता. एकेकाळी त्याचं वजन २३० किलो झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला इतक्या वजनासह जगणं कठीण असल्याचं सांगितलं. अतिवजनामुळे पत्नीही सोडून गेली, पण त्यानंतर स्वतःवर मेहनत घेऊन अदनान सामी पुन्हा स्लिम-ट्रिम झाला आणि २००७ मध्ये लोकांसमोर आल्यावर त्याला पाहून सर्वच हैराण झाले. काही रिपोर्ट्सनुसार सर्जरी न करता अदनानचं वजन २३० किलोहून कमी होऊन थेट ७५ किलो झालं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2020 10:32 am