सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो, याचीच प्रचिती सध्या येत आहे. २०१० मधला एका आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. लग्नात वधू-वर ऐकमेकांना फुलांची माळ घालताना तुम्ही पाहिलं असेल पण या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जोडप्याने ऐकमेकांच्या गळ्यात चक्क साप घातले आहेत. काहीसा चक्रावून टाकणारा हा व्हिडिओ बीडमधला असल्याचं समजतं. काही वृत्तपत्राच्या माहितीनुसार या जोडप्याचं नाव सिद्धार्थ आणि सृष्टी असल्याचं समजतं. २०१० साली नोव्हेंबर महिन्यात त्यांचं लग्न झालं होतं. ते दोघंही वनखात्यात कामाला आहेत. लग्नानंतर या दोघांनीही सापांना जंगलात सोडून दिले होते. त्यांच्या लग्नाच्या सात वर्षांनंतर हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.