ब्रिटिश राजकारणात प्रचंड निंदेचा आणि विनोदाचा विषय ठरलेले ब्रिटिश राजकारणी नायजेल फराज यांच्याविषयी आणखी एक विनोदी प्रकार घडला आहे. युरोपियन युनियनच्या पार्लमेंटमध्ये नायजेल फराज भाषण करत असताना इंग्लंडच्याच एका प्रतिनिधी ‘हा खोटं बोलतोय’ असा बोर्ड भर सभागृहात उचलल्याने नायजेल फराज यांच्याविषयी विनोदांना आणखी उधाण आलंय.

कट्टर उजव्या विचारसरणीच्या आणि इंग्लंडच्या राजकारणात कोणतंही व्यापक स्थान नसलेल्या नायजेल फराज यांची प्रतिमा अतिशय संधिसाधू राजकारणी अशी आहे. आणि या संधिसाधूपणालाही चतुरतेची किनार बिलकूल नाही.

 

संधिसाधूपणाचा मूर्तिमंत अवतार!
संधिसाधूपणाचा मूर्तिमंत अवतार!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश अवतार म्हणून नायजेल फराज यांच्याकडे पाहिलं जातं. त्यातही ट्रम्प हे हुशार उद्योगपती म्हणून ओळखले जातात. नायजेल फराजचं तसंही काही कर्तृत्व नाही.

गेल्या वर्षी झालेल्या ‘ब्रेक्झिट’च्या मतदानाच्या वेळी इंग्लंडने युरोपियन युनियनच्या बाहेर पडावं यासाठी फराजनी प्रचंड विखारी प्रचार केला होता. युरोपियन युनियनला काही करारांअंतर्गत अब्जावधी पौंड्स ब्रिटनला देणं बंधनकारक होतं. अर्थात त्या बदल्यात अनेक फायदेही इंग्लंडला मिळत होते. पण आपण युरोपियन युनियनबाहेर पडलो तर हे सगळेच्या सगळे पैसे इंग्लंडला मिळतील असा कोणताही आधार नसलेला प्रचार त्यांनी केला . या मोहिमेसाठी त्यांनी अनेक बसेसवर आपला हा संदेश लिहितं ‘बसयात्रा’ काढली. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत ब्रिटिश मतदारांनी युरोपियन युनियनबाहेर पडायचा कौल दिला आणि मीडियात मिरवून झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ‘हे अब्जावधी पौंड्स इंग्लंडला मिळतीलच असं काही नाही’ असं व्यवस्थित घूमजाव करत फराज यांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत मतदान केलेल्या लाखो मतदारांचा संताप ओढवून घेतला. ज्या पक्षातर्फे त्यांनी ब्रेक्झिट चा प्रचार केला होता त्या तथाकथित ‘युके इंडिपेन्डन्स पार्टी’चा शहाजोगपणे राजीनामाही त्यांनी दिला.

यामुळे त्यांची इंग्लंड आणि जगामधली प्रतिमा प्रचंड डागाळली आहे आणि नेटवर आणि टीव्हीवर ते एक मोठा विनोदाचा विषय झालेत.

viral video : जंगलात सिंह पाहायला आलेल्या पर्यटकांना असे दिले राजाने दर्शन

आता युरोपियन युनियनच्या पार्लमेंटमध्येच त्यांचं भाषण सुरू असताना त्यांच्याच ब्रिटिश सहकाऱ्याने ‘हा खोटं बोलतोय’ अशा प्रकारचा बोर्ड दाखवल्याने त्यांच्यावर होणाऱ्या जोक्सना आणखी उधाण येणार आहे हे निश्चित!