बांगलादेशवर मात करत टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत या ३ संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चीत झालं असून चौथ्या जागेवरही न्यूझीलंडचा संघ निश्चीत मानला जात आहे. मात्र यासाठी त्यांना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना होण्याची वाट पहावी लागणार आहे.

टीम इंडियाच्या या कामगिरीवर संपूर्ण भारतवासी सध्या खूश आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक कोडं घालत, खेळाडूचं अचूक नाव ओळखायला सांगितलं आहे. सर्वात प्रथम बरोबर उत्तर देणाऱ्या व्यक्तीला महिंद्रा यांनी, महिंद्रा कंपनीची एक अत्याधुनिक टॉय कार देण्याचं आश्वासन दिलं आहे.

त्यामुळे चालवा डोकं, आणि ओळखा कोण आहे हा खेळाडू??