08 March 2021

News Flash

…म्हणून चीनच्या ‘त्या’ ड्रायव्हरने बस तलावात उलटवली, 21 जणांचा झाला मृत्यू

तपासानंतर चीनच्या पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती...

PC : (Long Rui/Xinhua via AP)

चीनमध्ये गेल्या आठवड्यात एक बस तलावात पडल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये २१ जणांचा मत्यू झाला होता. या अपघाताबाबत आता धक्कादायक खुलासा झाला आहे. हा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला, अशी माहिती तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Bloomberg च्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरनेच हा अपघात घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी तपासानंतर दिली आहे. ‘झांग नावाच्या त्या बस ड्रायव्हरचं घर जमीनदोस्त करण्यात आलं होतं. त्यामुळे तो प्रचंड नाराज होता. म्हणून त्याने जाणूनबुजून हा अपघात घडवला, त्याने दारुचं सेवन केल्याचंही स्पष्ट झालं आहे’, अशी माहिती पोलीस विभागाकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.

सात जुलै रोजी चीनच्या गुईझू (Guizhou) प्रांतात रस्त्याच्या किनारी असलेल्या एका तलावात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस पडल्याने ड्रायव्हरसह २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १५ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:37 pm

Web Title: china police blames unhappy bus driver for crash that killed 21 sas 89
Next Stories
1 करोनामुळे नोकरी गेली पण नशीबानं या भारतीयाला मिळाली कोट्यधीची Lamborghini
2 Viral Video : मुंबईच्या रस्त्यावर पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं आणि…
3 अजब… कार चोरीच्या २० दिवसांनंतर पोलिसांनी मालकालाच गाडीच्या फोटोसह पाठवलं ‘ओव्हरस्पीड’चं चलान
Just Now!
X