News Flash

२०२० मध्ये एलियनही सापडणार? चीनच्या नव्या मोहिमेला सप्टेंबरपासून सुरुवात

२०११ पासून सुरु होते या मोहिमेचे काम, उभारली जगातली सर्वात मोठी दुर्बीण

प्रातिनिधिक फोटो

जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला असतानाच जगभरातील वेगवेगळ्या भागांना नैसर्गिक आपत्तींलाही तोंड द्यावे लागत आहे. भारतामध्येही पूर्वी आणि पश्चिम किनारपट्टीला मागील एका महिन्यात दोन मोठ्या वादळांनी तडाखा दिला आहे. दिल्लीमध्येही मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यामुळेच आधीच करोनाची दहशत असतानाच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे हे वर्ष अजून काय काय दाखवणार आहे अशापद्धतीचे मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे. अशातच एका मजेदार मेसेजमध्ये आता या वर्षी फक्त डायनोसॉर आणि एलियन पहायचे राहिले आहेत असं म्हटलं आहे. गंमत म्हणून हा मेसेज शेअर केला जात असला तरी याच वर्षीपासून चीनने खरोखरच एलियन्सचा शोध घेण्यासाठी श्रीगणेशा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शोध चीन त्यांच्या जगप्रसिद्ध ‘फास्ट’ दुर्बीणीमधून घेणार आहे.

चीनमध्ये उभारण्यात आलेली जगातील सर्वात मोठी दुर्बीण परग्रहावरील जीवसृष्टीचा म्हणजेच एलियन्सचा शोध घेण्यासाठी तयार झाली आहे. यासंदर्भातील माहिती चीन सरकराच्या माध्यमातून चालवण्या येणाऱ्या ‘सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी डेली’ने ‘चायना टेकसीटी’च्या माध्यमातून आठवडाभरापूर्वी जारी करण्यात आली आहे. चीनमधील फाइव्ह हण्ड्रेड मीटर अ‍ॅपरचर स्पीरीकल टेलिस्कोप म्हणजेच ‘एफएएसटी’च्या (फास्ट) मदतीने विश्वासंदर्भातील सखोल संशोधनाबरोबर एलियन्सचा शोध घेण्याचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरु करणार आहे. जानेवारी महिन्यापासून ही दुर्बीण वापरण्यास सुरुवात झाली आहे.मात्र काही कारणास्तव या दुर्बिणीच्या माध्यमातून संशोधन सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

चीनमधील या दुर्बिणीचा परावर्तक ३० फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, त्यावर ४४५० पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. २०११ ते २०१६ या कालावधीमध्ये या दुर्बिणीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं. मागील अनेक वर्षांपासून या दुर्बिणीचंया चाचण्या सुरु होत्या. पिंगटांग येथे ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. पाचशे मीटर अ‍ॅपरचरची ही घनगोलाकार ही दुर्बीण आहे, असे नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन या संस्थेच्या अंतर्गत खोल अवकाशात संशोधन करण्यासाठी चीनने हा दुर्बीण प्रकल्प आखला आहे. विश्वाचे सखोल संशोधन व परग्रहावरील जीवसृष्टीचे संशोधनही त्यात केले जाणार आहे. येत्या १० ते २० वर्षांत एवढी मोठी रेडिओ दुर्बीण तयार होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील प्युटरो रिकोतील आर्सेसिबो ऑब्झर्वेटरीपेक्षा ही दुर्बीण मोठी असून, तिचा व्यास खूप मोठा आहे. जर्मनीतील १०० मीटर दुर्बिणीपेक्षा ती दहापट संवेदनशील आहे. या दुर्बिणीच्या उभारणीसाठी गुईजौ प्रांतातील जवळपास ९ हजारांहून अधिक लोकांना विस्थापित करण्यात आल्याचे सांगण्यात येतं.

एफएएसटीचे मुख्य वैज्ञानिक झांग टोंझी यांनी या संशोधनाचा इतर नियमीतपणे होणाऱ्या कोणत्याही संशोधनावर परिणाम होणार नाही यासंदर्भात काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. हे संशोधन ज्या वेगाने सुरु आहे त्यानुसार आपल्याला कदाचित नजीकच्या भविष्यात काही खास गोष्टी सापडण्याची शक्यता धुसर असल्याचेही झांग यांनी स्पष्ट केलं आहे. झांगच्या मते काही अरुंद बँडच्या रेडीओ लहरी मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या रेडीओ लहरी कोणत्याही बुद्धिमान जीवसृष्टीकडून येण्याची अपेक्षा नगण्य आहे. अशाप्रकारच्या रेडीओ लहरी या पल्सर्स (विशिष्ट प्रकारचे तारे) किंवा यादृच्छिक जलद रेडिओ बस्टच्या माध्यमातून निर्माण होतात. तरीही परग्रहावरील जीवसृष्टीकडून आपल्याला काही रेडिओ संदेश पाठवण्यात येत असतील तरी ते आपल्याला मिळण्याची शक्यता अधिक आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून अशा रेडिओ लहरी पकडल्या जाण्याची शक्यता अधिक असल्याचे झांग यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 5:04 pm

Web Title: chinas giant radio telescope fast will start searching for aliens in september scsg 91
Next Stories
1 भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे?
2 दोन वर्षांच्या शोधानंतर आनंद महिंद्रांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
3 ४०० कोटी वर्षांपूर्वी लघुग्रह आदळल्याने पृथ्वीवर झाली जीवसृष्टीची निर्मिती; जपानी संशोधकांचा दावा
Just Now!
X