ऑस्ट्रेलियात आपल्या मुलीला भेटण्यासाठी मुंबईहून निघालेल्या ६५ वर्षांच्या आजीबाईंना बॅगवर ‘बॉम्बे’ bombay ऐवजी ‘बॉम्ब’ लिहणं चांगलचं महागात पडलं. बॅगवर ‘बॉम्ब’ असं लिहिलेलं पाहून ब्रिस्बेन विमानतळावरील सुरक्षारक्षकांना चांगलाच घाम फुटला. त्यांच्या बॅगेत खराखुरा बॉम्ब असल्याचं वाटून प्रवासीही चांगलेच घाबरले होते.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी व्यंकटा लक्ष्मी आजी मुंबईहून ब्रिस्बेनला निघाल्या. प्रवासात आपली बॅग हरवू नये यासाठी त्यांनी मूळ सवयीप्रमाणे त्यावर आपलं नाव आणि कुठून कुठे जातोय याची पट्टी चिकटवली. यावर त्यांनी ठळक अक्षरात ‘bomb to Brisbane’ लिहिलं. बॅगवर चिकटवलेली ही पट्टी पाहून ब्रिस्बेन विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण होतं अशी माहिती त्यांच्या मुलीनं दिली. पण, कागदी पट्टीवर bombay बॉम्बे असं पूर्ण लिहायला जागा नव्हती म्हणून आपण बॉम्ब लिहिलं असं आजींनी सांगितलं. तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

Video : राजघराण्यातील सासू-सुनेचा हायव्होल्टेज ड्रामा कॅमेरात कैद !

नावाची पट्टी पाहून आजींना विमातळावरील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, पण आजींनी आपलं कारण पटवून दिल्यानंतर आणि त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना सोडून दिलं. ही बॅग घेऊन मी मुंबई विमानतळावर होते तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही असंही आजी म्हणाल्या.