एरिक्सन इंडियाला द्यायचे ४५८ कोटी ७७ लाख रुपये सोमवारी अनिल अंबानी यांनी सोमवारी (१८ मार्च २०१९) न्यायालयाकडे जमा केले. मंगळवार (१९ मार्च २०१९) पर्यंतची मुदत यासाठी न्यायलायने अनिल अंबानींना दिली होती. मुदत संपण्याच्या एक दिवस आधीच अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ मुकेश अंबानी आणि नीता यांनी ही रक्कम देण्यासाठी अनिल यांना मदत केली. ही रक्कम भरल्याने अनिल अंबानी यांची अटकही टळली. यानंतर अनिल यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानताना, ‘कठीण प्रसंगात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’, सांगितले.

मंगळवारी मुदत संपण्यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपये दिले. रक्कम मुदतीत न भरल्यास तुरुंगात टाकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंबानी यांना बजाविले होते. कंपनीने ही रक्कम न भरल्यास अंबानी यांना किमान तीन महिन्यांच्या शिक्षेला सामोरे जावे लागले असते. मंगळवारी कोर्टात पैसे जमा केल्यानंतर अनिल अंबानी यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अंबानी कुटुंबात दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता. मात्र, संकटसमयी मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांना मदत केल्याचे समोर आले. सोशल नेटवर्किंगवरही याच मदतीची भरपूर चर्चा रंगली आहे. अनेकांनी मुकेश अंबानींसारखा भाऊ आपल्यालाही असायला हवा असं मत व्यक्त केलं आहे तर काहींनी मदतीवरुन देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती भाऊ असल्याचा काय फायदा होतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

> अपने भाई जैसा

> मी पण तुमच्या भावासारखाच…

> अंबानी कुटुंबाची सध्याची स्थिती

> आता हे सिनेमे पाहणार

> असं झालं तर

> अपना भाई आऐगा…

> आम्ही करतो बंदोबस्त

> भाऊ सगळ्यांचे असतात… सगळ्यांचे नसतात…

> मुकेश कुठे आहे

> काही नाती

> आगामी सिनेमा

> …आणि इथे माझा भाऊ

> तेरा भाई हू मैं

> कधीपर्यंत…

> आमचं असं होतं

> पॉकेटमनी गेला

> विश्वासच बसत नाही

दरम्यान अनेकांनी #MukeshNitaSaveAnil तसेच #MukeshSaveAnil हॅशटॅग वापरून या बातमीबद्दल आपली मते ट्विटवर मांडली. मुकेश अंबानींने केलेल्या मदतीबद्दल बोलताना अनिल अंबानी म्हणाले, ‘मी आणि माझे कुटुंब भूतकाळातून बाहेर पडलोय. माझा मोठा भाऊ मुकेश आणि वहिनी नीता हे दोघे कठीण काळात माझ्या पाठिशी उभे राहिले. या मदतीसाठी मी आभारी आहे. अशा प्रसंगात मदत करुन त्यांनी कुटुंबाचे महत्त्व आणि कुटुंबातील मूल्य हे अधोरेखित केले. आम्ही जुन्या गोष्टी विसरुन आता पुढे जात आहोत. त्यांच्या या वागणुकीमुळे मी खरंच प्रभावित झालो आहे.’