राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र थेट लॉकडाउन न लावता बुधवारी राज्य सरकारने कठोर निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये कार्यालयातील उपस्थितीपासून लोकल प्रवासाला बंदी ते लग्न समारंभांपासून अत्यावश्यक सेवेतील लोकांसंदर्भातील अनेक नियमांचा समावेश आहे. मात्र या नियमांपैकी लग्नांसंदर्भातील नियम सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. २२ एप्रिल सायंकाळी आठ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असणाऱ्या या नियमांमध्ये लग्न दोन तासात उरकण्यास सांगण्यात आलं आहे. सोशल मिडियावर यावरुनच अनेकांनी मुख्यमंत्रीसाहेब, लग्न दोन तासात कसं उरकायचं तुम्हीच सांगा असं म्हटल्याचं दिसत आहे.

लग्नासंदर्भातील नियम काय

लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये करता येणार आहे. तसेच लग्न समारंभातील सर्व विधी दोन तासांमध्येच पूर्ण करणं नवीन नियमांनुसार बंधनकारक आहे. संपूर्ण लग्नाचा कार्यक्रमासाठी केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे. या लग्नासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. लग्नांसंदर्भातील या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला (वधू-वर) ५० हजार रुपये दंड ठोठवला जाईल. तसेच हॉल व्यवस्थापनावरही कारवाई करण्यात येणार असून दोषी आढळल्यास करोना महामारीची परिस्थिती सामान्य होईपर्यंत हॉलवर बंदी घालण्यात येईल.

याच कठोर नियमांवरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच खळबळ उडाल्याचं चित्र दिसत आहे. अनेकांनी दोन तासात लग्न कसं करायचं?, दोन तासात लग्न शक्य तरी आहे का?, अशा गंभीर प्रश्नांबरोबरच मजेदार प्रतिक्रियाही दिल्यात. चला पाहुयात कोणाचं काय म्हणणं आहे.

१) या प्रश्नांचं काय?

२) भावनांचा खेळ

३) शक्य आहे का हे खरंच

४) ही पण वसुलीच…

५) असा नियम बनवा ना…

६) पुढेच ढकला

७) कपडे कोण आणुन देणार?

८) त्यापेक्षा ऑनलाइन करा…

९) अशी काहीतरी शिक्षा करा

१०) दोन महिने नाही केलं लग्न तर…

११) असे सर्वसामान्यांसाठी नियम बनवा

१२) ही लग्न किती टीकणार?

१३) दोन तासात काय करायचं?

१४) कितीदा नियम बदलणार?

१५) तुम्ही तुमच्या पोराचं लग्न लावून दाखवा

१६) दोन तास तर…

एकंदरितच लग्न समारंभाला २५ जणांची उपस्थिती हा मुद्दा योग्य वाटत असला तरी अनेकांनी दोन तासात लग्न ही अट जाचक असून ते प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण जाईल असं मत नोंदवल्याचं चित्र दिसत आहे.