सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु असून तुम्हालादेखील नातेवाईकांपैकी किंवा ओळखीतल्या कोणाचं तरी निमंत्रण आलं असेलच. लग्नात जायचं म्हटलं की तिथे जेवायला काय असेल हा विचार तर प्रत्येकाच्याच डोक्यात असतो. अन् लग्न झालं की संपूर्ण चर्चा जेवणावरच सुरु असते…पण सध्या लग्नातला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर एखादी व्यक्ती इतकी विकृत कशी असू शकते असा विचार तुमच्या मनात येईल.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका लग्नातील आहे. या व्हिडीओत लग्नाचा स्वयंपाक सुरु असून स्वयंपाकी तंदुरी रोटी करताना दिसत आहे. विकृत म्हणजे रोटी तंदुरमध्ये टाकण्याआधी स्वयंपाकी त्याच्यावर थुंकत आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला असून तो फक्त एका नाही तर बनवणाऱ्या प्रत्येक रोटीवर अशा प्रकारे थुंकताना दिसत आहे. हा व्हिडीओ १६ फेब्रुवारीचा आहे. मेरठमध्ये हे लग्न सुरु होते.
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मेरठ पोलिसांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याची विनंती केली. सध्या करोनाचं संकटात ही किती गंभीर बाब आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
थूककर रोटी बनाई…!
कोविड जैसी भयावह बीमारी खत्म भी नही हुई और इस प्रकार की मानसिकता वाले लोग अपनी जाहिलीयत दिखाने से नही चूके।
फिर @meerutpolice ने पकड़ा इन्हें। pic.twitter.com/9CQlLEPRmX
— Anamika Jain Amber (@anamikamber) February 21, 2021
हिंदू जागरण मोर्चाने या घटनेची दखल घेत मेरठ पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोहेल असं या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.