आयपीएल सुरू आहे आणि आयपीएल सामन्यादरम्यान दिसणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’ची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. चैन्नई सुपर किंग्सच्या प्रत्येक मॅचसाठी ही ‘मिस्ट्री गर्ल’ नेहमीच उपस्थित असते. त्यामुळे ती नेमकी कोण याचं कुतूहल अनेकांना होतं. अखेर सोशल मीडियानं जिला ‘मिस्ट्री गर्ल’ नाव दिलं त्या मिस्ट्री गर्लची ‘मिस्ट्री’ उलगडली आहे.
ही मिस्ट्री गर्ल क्रिकेटर दीपक चहरची मोठी बहिण असल्याचं समजत आहे. तिचं नाव आहे मालती चहर. दीपक चहर चैन्नई सुपर किंग्सच्या संघातून खेळत आहे. तेव्हा लहान भावाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी ती आवर्जून स्टेडिअममध्ये उपस्थित असते. मालती ही मिस- दिल्ली सौंदर्य स्पर्धेची रनर अप ठरली आहे. ती मॉडेल आहे तसेच सध्या चित्रपट इण्डस्ट्रीत आपलं करिअर घडवण्यासाठी धडपडत आहे. मालती धोनची मोठी चाहती आहे. त्यामुळे चैन्नईच्या प्रत्येक सामन्यात धोनीला आणि भावला पाठिंबा देण्यासाठी ती आवर्जून हजर असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 5:37 pm