अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांचा अभिनय असलेला गुलाबो-सिताबो हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. लॉकडाउन काळात सर्व थिएटर-मॉल, सिनेमागृह बंद असल्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज केला. सोशल मीडियावरही चाहत्यांनी अमिताभ आणि आयुष्यमानच्या अभिनयाचं कौतुक केलं. नागपूर पोलिसांनी या चित्रपटातून प्रेरणा घेत, सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन फसवणूकीविरोधात जनजागृती करण्यासाठी एक मिम तयार केलं आहे.

ज्यावेळी तुम्हाला कोणीही मोठी हवेली, संपत्ती प्रलोभनं देत असतं आणि अचानक तुमचा OTP विचारतं तेव्हा…कुछ कह नही सकते असं म्हणा.. चित्रपटातील एक प्रसंगाचा आधार घेत नागपूर पोलिसांनी हे मिम तयार केलं आहे.

या चित्रपटाचा दिग्दर्शक शुजित सरकारनेही, नागपूर पोलिसांच्या या क्रिएटिव्हीटीला दाद देत, Absolutely right असं म्हणत दाद दिली आहे.

सध्या लॉकडाउन काळात अनेक चित्रपट ओटीटी माध्यमाचा मार्ग अवलंबत आहेत. लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. यासाठी नागपूर पोलिसांनी चित्रपटांच्या मिमचा आधार घेत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा केलेला प्रयत्न वाखणण्याजोगा आहे.